निरोगी आयुष्यासाठी स्वच्छता महत्त्वाची - रंगनाथनाना काळेसंत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराची सांगता-



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.22- मानवी आरोग्य निरोगी राहण्यासाठी ग्राम स्वच्छता महत्त्वाची आहे. गावामध्ये स्वच्छता नसेल तर त्याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर होतो. मानवी आरोग्य सुधारावे यासाठी स्वच्छता हा मूळ घटक मानून तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे ग्राम स्वच्छता मंत्री मा आर आर पाटील यांनी राज्यात ग्राम स्वच्छता अभियान राबवून ग्राम स्वच्छतेचा वेगळा मंत्र दिला. असे मत जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रंगनाथनाना काळे यांनी व्यक्त केले.


 ते संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते.
     यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष हरिश्चंद्र लगाने, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जळगाव जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष रिजवान खाटीक, प्राचार्य डॉ शिरीष पवार, उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे, माळेगावच्या सरपंच सौ साधनाताई राजपूत, जि.प शाळेचे मुख्याध्यापक बारी सर आदी मान्यवर उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ प्रदीप गोल्हारे यांनी तर प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ निलेश गावडे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील विविध कामाबाबत स्वयंमसेवक दिप्ती सोनवणे, वैष्णवी एलिस यांच्यासह इतर विद्यार्थ्यांनी भूमिका मांडल्या.
    या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक रवींद्र राजपूत, शिवराम जाधव, डॉ निलेश गावडे, डॉ पंकज गावित, डॉ प्रदीप गोल्हारे यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
    या कर्यक्रमासाठी गावकरी, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments