शिर्डी ( प्रतिनिधी) श्री साईबाबांनी आपल्याला जीवन दिलं. हातपाय दिले. त्यामुळे मेहनत करून कर्म करायचं असतं. कर्माने फळ मिळतं. साईबाबांचा फक्त त्यासाठी आशीर्वाद पाहिजे . व तो आपल्या डोक्यावर आहेच. असे मत प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन यांनी व्यक्त केले.
प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन ही शिर्डीला आली होती. तिने साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. साईबाबांच्या दर्शनानंतर रविनाचा, साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे यांनी सत्कार केला. यावेळी जनसंपर्क विभागाचे पर्यवेक्षक प्रशांत सुर्यवंशी देखील उपस्थित होते.
साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलतांना रविनानं म्हटलं, "मी साईभक्त असून शिर्डीला लहान असतांना मला वडील घेवून येत होते. त्यावेळपासून मी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येत आहे. माझे वडीलानंतर मी आणि आता माझ्या मुलांनाही साईबाबांच्या दर्शनासाठी घेवून येत असते. साईबाबांना मध्ये मला माझे वडील दिसतात. साईबाबांचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर आहेत. मात्र साईबाबांना मी कधीच काही मागत नाही. साईंनी आपल्याला जिवन दिलं आहे, हातपाय दिलेले आहेत. त्यामुळे मेहनत करून कर्म कमवायचे असते, कर्माने फळ मिळते. मात्र साईबाबांचे आभार मानण्यासाठी साईदरबारी मी नेहमीच येत असते." रविना टंडनची मुलगी राशा ही 'आझाद' चित्रपटात काम करत आहे. तिच्याबरोबर अभिनेता अजय देवगणचा भाचा अमन देवगननं मुख्य भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केलं आहे. हा चित्रपट सुमारे 80 कोटीच्या बजेटमध्ये निर्मित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे निर्माते प्रज्ञा यादव, रॉनी स्क्रूवाला हे आहेत. 'आझाद' चित्रपटानं आतापर्यंत रुपेरी पडद्यावर 5.75 कोटीची कमाई केली आहे. मात्र या चित्रपटामधील 'उई अम्मा' या गाण्यामुळे राशाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. तिच हे गाणं खूप हिट झालं आहे. आपल्या मुलीच्या करिअरसाठी व साईबाबांचे आभार मानण्यासाठी रविना टंडननं बुधवारी शिर्डीत साईबाबाचं दर्शन घेतल. व राशाला यापुढेही चित्रपटात चांगली संधी मिळू दे! असं साईचरणी मनोमन साकडं घातलं. रविना टंडन शिर्डीत आल्याचे समजताच चहात्यांनी संस्थान प्रवेशद्वारासमोर तिला पाहण्यासाठी गर्दी केली होती.
0 Comments