सोयगावात रस्ता रोको-
दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.22 -सोयगाव-शेंदूरणी-हळदा रस्त्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे होत आहे रस्ता गुणवत्ता पूर्वक होत नाही या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे हा रस्ता आधीच मृत्यूचा सापळा बनला आहे संबंधित विभागाचे या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे.
त्यामुळे सदर रस्ता गुणवत्ता पूर्ण व्हावा यासाठी बुधवारी अकरा वाजेपासून ते एक वाजेपर्यंत सोयगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचे सुनील गावंडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय रस्ता रोको करून निदर्शने करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते फरदापुर रस्त्यावर वाहनांची रांगा च रांगा लागल्या होत्या यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अजय टाकसाळ यांनी सदर काम हे गुणवत्ता पुर्वक करण्यात येईल, तसेच अंदाजपत्रक नुसार काम करून (दि.३१) मार्च पूर्वी हे काम पूर्ण करण्यात येईल. काम पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदाराला दंड देण्यात येऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी साईड पट्ट्या मुरुमाने भरण्याची आश्वासन दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) रंगनाथ काळे, शिवसेना तालुकाप्रमुख (उबाठा) दिलीप मचे,मंगेश सोहनी,मयूर मनगटे,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र काळे,राष्ट्रवादी शहराध्यक्ष (शरद पवार गट) रवींद्र काळे, गजानन चौधरी, रवींद्र काटोले,राजेंद्र जावळे, संजय मोरे, शोभराज चौधरी, संजय तायडे, नामा जाधव, वसंत बनकर, प्रमोद पाटील ,भागवत बारी, रघु बारी, समाधान आगे, अजय नेरपगारे आदी उपस्थित होते.दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या लेखी आश्वासनाच्या मुदतीत रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा भाजपचे सुनील गावंडे यांनी दिला आहे.
0 Comments