टाकळीभान परिसरात मध्ये अपघाताच्या सत्र सुरूच ,दुसऱ्या दिवशी दोन अपघात

टाकळीभान प्रतिनिधी- श्रीरामपुर नेवासा राज्यमार्ग ४४ वर टाकळीभान हद्दीत आपघाताचे सञ सुरुच आहे. मंगळवारी झालेल्या भिषण आपघातानंतर लोखंडी फाॕल जवळ टाकळीभान हद्दीत एक जनावराचे खाद्य घेवुन जाणारा टेम्पो रोडवरच पल्टी झाला तर दुसऱ्या घटनेत टाकळीभान बसस्थानक परीसरात एका वृध्देला धक्का मारुन पोबारा केलेली चारचाकि कार मिरीकर यांच्या शेताजवळ रोडवरुन खड्यात जावुन पल्टी झाली आहे.
            



 श्रीरामपुर नेवासा या राज्यमार्ग क्र. ४४ चे नुतनीकरण झाल्याने वहाने वेगाने जात आहेत. मंगळवारी लग्न समारंभ आटोपुन टाकळीभान येथे घराकडे परतत आसताना बोलेरो जीपचा भिषण आपघात झाल्याने तीन जण ठार झाले होते तर दोघांची प्रकृती गंभीर होती. या दुर्दैवी घटनेनंतर काल बुधवारी पुन्हा या राज्यमार्गावर दोन ठिकाणी अपघात झाले. सुदैवाने या दोन्ही आपघातात जिवीत हानी झाली नसली तरी वहानांचे मोठे नुकसान झाले आहे. नेवाशाकडुन जनावरांचे खाद्य घेवुन श्रीरामपुर कडे येत आसलेला महेंद्रा पिकआप बोलेरो टेम्पो क्र. एम. एच. १६ - ए.वाय. ३९०५ हा भरघाव वेगाने जात आसताना लोखंडी फाॕल परीसरातील टाकळीभान शिवारात रोडवरच पल्टी झाला. तर दुसऱ्या एका घटनेत टाकळीभान येथे बसस्थानक परीसरातुन ईंडीगो सी. एस. चारचाकि क्र. एम. एच. २० - बी. एन. ५०२९ जात आसताना एका वृध्द महीलेला धक्का मारुन भरघाव वेगाने पळुन जात आसताना एक कि.मी. आंतरावर जावुन मिरीकर यांच्या शेताजवळ रोडवरुन सुमारे पंचवीस फुट खोल काट्याच्या झुडपात जावुन पल्टी झाली. सुदैवाने वृध्देला किरकोळ ईजा झाली तर चालकही या घटनेत बालबाल बचावला. माञ चारीचाकि पृल्टी होताच चालक वहान जागेवर सोडुन पळुन गेला.

Post a Comment

0 Comments