दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.13 -- सोयगाव तालुक्यातील 9 हजार निराधारांना संक्रांतीपूर्वी मानधन न मिळाल्याने निराधारांवर संक्रांत आली आहे मागील काही महिन्यांपासून तालुक्यातील या योजनेतील लाभार्थ्यांचे डोळे या मानधनाकडे लागले होते.
मंगळवारी संक्रांतीचा सण असल्याने संक्रांतीपूर्वी हे मानधन मिळण्याची प्रतीक्षा सर्व निराधारांना लागली होती.परंतु अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन दांड्या आणि कामचुकार पणा यामुळे बी डी एस काढता आलेले नसल्याने तालुक्यातील निराधारांना मानधन पासून वंचित राहावे लागले आहे दरम्यान, तालुक्यातील 9,370 निराधारांना आता संक्रांतीनंतर मानधन मिळणार यात संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दोन महिन्याचे तीन हजारप्रमाणे, तर इंदिरा गांधी योजनेतील लाभार्थ्यांना दोन महिन्याचे चार हजार पाचशे रुपयां प्रमाणे हे मानधन रखडले आहे.दरम्यान, या योजनेतील लाभार्थ्यांचे धनादेश आता बँकेत जमा होऊन.त्यानंतर बँक स्तरावरून हे मानधन अदा करण्याची कार्यवाहीसाठी आठवडा लागेल त्यामुळे निराधाराना विलंब होईल.
अनेकदा बँकेच्या उदासीनतेमुळे धनादेश जमा होऊनही लाभार्थ्यांना हे मानधन वेळेवर मिळू शकत नाही. आता पुढच्या आठवड्यात तालुक्यातील सर्वच लाभार्थ्यांना हे मानधन देण्याची काळजी बँकांनी घ्यावी, अशी मागणी लाभार्थ्यांतून होत आहे.दरम्यान या लाभार्थ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून शासनााचे अनुदान मिळत नसल्याने अनेकजण बँकांमध्ये चकरा मारत असल्याचे दिसून येत आहे.
0 Comments