टाकळीभानच्या आठवडी बाजारातून चार ते पाच मोबाईलची चोरी. मोबाईल धारका वर संक्रात

टाकळीभान प्रतिनिधी - श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील आठवडी बाजारातील गर्दिचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी चार ते पाच  जणांचे मोबाईल चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. मोबाईल धाराकावर संक्रात,
       टाकळीभान येथील आठवडी बाजार सोमवारी असतो तसेच टाकळीभानसह परिसरातील गावातील ग्राहक बाजार करण्यासाठी येतात त्यामुळे बाजारात मोठी गर्दी असते आणि या गर्दिचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी चार ते पाच  जणांचे हजारो रूपये किंमतीचे मोबाईल हातोहात लंपास केले आहे.
       आज येथील पोलिस स्टेशन दरवाजा बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी बाजारातून मोठ्या किंमतीचे मोबाईलवर डल्ला मारला आहे. मोबाईल चोरी झालेल्या ग्राहकांना मोबाईल नसल्याने फोनपेवर  व्यवहार करता न आल्याने त्यांना बाजार न करता रिकाम्या हाताने घरी परतावे लागले.
        बाजारातून मोबाईल चोरी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून या पुर्वीही बाजारात येणाऱ्या ग्राहकांचे मोबाईल चोरीला गेलेले आहेत. बाजारात वस्तू खरेदी करण्यात मग्न असलेले नागरिक पाहून चोरटे त्यांचे मोबाईल खिशातून अलगद काढून घेवून जातात. हे चोरटे चांगल्या कंपनीचे आणि मोठ्या किंमतीचे मोबाईल चोरटे चोरीत आहेत. त्यामुळे बाजार करण्यासाठी येणार्‍या ग्राहकांमध्ये खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे.
         आशा मोबाईल चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा तसेच पोलिसांनी आठवडी बाजारात गस्त घालून चोरट्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments