संत तुळशीराम महाराज देवस्थानच्या कमानीचा शुभारंभ, सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा प्रसंग गुरूवर्य भास्करगिरी महाराज यांचे प्रतिपादन



टाकळीभान प्रतिनिधी-   मुठेवाडगांल येथील  सद्गुरू संत तुळशीराम महाराज यांच्या  नावाने देवस्थानने  २० लक्ष रूपये  खर्चून बांधण्यात आलेल्या  कमानीचा शुभारंभ म्हणजे सुवर्ण अक्षरांनी लिहीण्यासारखा प्रसंग असल्याचे प्रतिपादन श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे गुरूवर्य भास्करगिरी महाराज यांनीशुभारंभ प्रसंगी बोलताना केले .
            श्रीरामपूर - नेवासा  राज्यमार्गावर खोकरफाटा येथून  खानापुर मार्गे ग़ोदावरीरील  चांदेगांव नागमठान पुलावरून  मराठवाड्यात  जाणाऱ्या,  राज्य मार्ग २१६ वर मुठेवाडगांव येथील  बंकटस्वामी (नेकनुर, बीड) यांचे शिष्य बालसंन्यासी सद्गुरू संत तुळशीराम महाराज,  यांच्या  नावाने देवस्थानचे वतीने   उभारण्यात आलेल्या  प्रवेशव्दार कमानीचा शुभारंभ  गुरूवर्य भास्करगिरी महाराज यांच्या शुभहस्ते आज संपन्न झाला.यावेळी उपस्थित भाविकांना उपदेश करताना महाराज म्हणाले की
शास्त्र आपल्याला धर्म अर्थ काम अन् मोक्ष शिकवते .त्याअनुसार  प्रत्येक प्रवेशव्दार कमानीस दोन कॉलमचे  खांब  म्हणजे धर्म अन्  मोक्ष आहे.
    संत तुळशीराम महाराजांनी हे  प्रवेशद्वार कमानीचे कार्य आपल्याकडून करवून आहे. ग्रामस्थ भाविकांच्या  उदार अंतःकरणाने दिलेल्या मदतीतून देवस्थान विश्वस्त मंडळाने २० लक्ष रुपये खर्च करून हे  काम पूर्ण केले.  देणगीदारांना  संत तुळशीराम बाबा आयुष्यात दुपटीने दाम देईल . हे काम यशस्वीपणे  पार पाडण्यासाठी गावातील सर्व तरूण मंडळ सरपंच, राजकीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते  सर्व देणगीदार यांचे महाराजांनी कौतुक केले.
             यावेळी मुकुंदराज संस्थान अंबेजोगाईचे मठाधिपती किसन महाराज पवार, यांनीही  उपदेशपर मनोगत व्यक्त केले. विजय महाराज कुहिले,बाळु महाराज, रामभाऊ महाराज मुठे,सुदाम महाराज मुठे, गोकुळ महाराज,ओंकार महाराज, मा.सभापती  डॉ वंदनाताई मुरकुटे,,
          या भव्यदिव्य प्रवेशव्दारास आकार देणारे डिझाईन कु. उत्कर्षा चौधरी, इंजिनिअर प्रफुल्ल नरवडे , सचिन वराळे, सहकार्य करणारे राजेंद्र पवार, बाजार समिती संचालक किशोर बनसोडे, अँड दिलीप मुठे, तुकाराम शेठ बिरदौडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे  इंजि.निलेश आसने या सर्व मान्यवरांचा भास्करगिरी महाराज यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब मुठे यांनी प्रास्ताविक केले. पोलिस पाटील दत्तात्रय मुठे यांनी सुत्रसंचलन केले,
    यावेळी  सरपंच, सागर मुठे,सुभाष मुठे, शिवाजी मुठे, बबनराव मुठे, वसंतराव मुठे, शिवाजी पवार, सुरेश मुठे, मारूती जासुद, रमेश पाचपिंड ,भिकचंद मुठे,तात्या चौधरी, प्रकाश मुठे डॉ गोकुळ मुठे, आप्पासाहेब मुठे, गणेश छल्लारे , रामदास पटारे, अँड बाळासाहेब तनपुरे,  प्रा.ऱगनाथ कोळसे,भागवत मुठेसर .पोलीस पाटील दत्तात्रय मुठे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments