दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.22 --राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमासाठी सोयगाव तालुक्यात नियुक्त करण्यात आलेल्या दोन पथकांपैकी जरंडी पथकास वाहन असून दुर्लक्षित असलेल्या फरदापुर-सावळदबारा सर्कल ला नोव्हेंबर 2024 पासून आरबीएसके पथकाला वाहन नसल्याने 74 अंगणवाडी व 62 शाळा या मधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी पथकातील महिला कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून.
याकडे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने गोरगरिबांच्या मुलांचे आयुष्य धोक्यात आले आहे. याप्रकरणी नवनियुक्त पालकमंत्री ना.संजय सिरसाट यांनी लक्ष घालावे अशी मागणी पालकवर्गातून केली जात आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) योजनेमध्ये जन्मजात हृदयविकार, बहिरेपणा, अंधत्व, तोंडाचे आजार आणि मानसिक आरोग्य स्थिती यासह लहान मुलांना प्रभावित करणारे आजार आणि आरोग्यविषयक समस्यांचा समावेश आहे.
आरोग्य आणि जीवनमान सुधारण्यासाठी भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा उद्देश जन्मापासून ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना लवकर हस्तक्षेप देणे हा आहे. परंतु वाहना अभावी आरबीएसके च्या सोयगाव-फरदापुर-सावळदबारा या 60 किमी अंतर असून वेळेवर बस गाड्या नसल्याने पथकात असलेल्या महिला डॉक्टर व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करीत पायपीट करावी लागत आहे.जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे पालकमंत्री ना.संजय सिरसाट यांनी लक्ष देऊन राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या पथकातील कर्मचाऱ्यांना वाहन उपलब्ध करून दयावे अशी मागणी पालकवर्गातून केली जात आहे.
-----राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे उद्दिष्ट--
मुलांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना लवकर हस्तक्षेप देणे
मुलांचे जीवनमान सुधारणे
मुलांना सर्वसमावेशक काळजी देणे
मुलांच्या आरोग्यातील दोष, रोग, कमतरता आणि विकास विलंब लवकर ओळखणे
मुलांना मोफत उपचार आणि व्यवस्थापन देणे
--राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची वैशिष्ट्ये--
या कार्यक्रमात जन्मापासून ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश आहे
या कार्यक्रमात तृतीय स्तरावरील शस्त्रक्रियांसह मोफत उपचार आणि व्यवस्थापन आहे
या कार्यक्रमात विद्यमान शालेय आरोग्य कार्यक्रमाचा समावेश आहे..
0 Comments