शिर्डी ( प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी राजेंद्र हरिभाऊ जपे तर व्हा. चेअरमनपदी सुरेश गोविंदराव वाघमारे यांची नुकतीच निवड झाली असून त्यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.
सावळीविहीर बुद्रुक विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची सभा नुकतीच सोसायटीच्या कार्यालयात संपन्न झाली.
यावेळी चेअरमन पदासाठी राजेंद्र हरिभाऊ जपे यांच्या नावाची सूचना संचालक कैलासराव सदाफळ यांनी मांडली त्यास सर्वानुमते किशोर गोरखनाथ आगलावे यांनी अनुमोदन दिले. व त्यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. त्याचप्रमाणे व्हा. चेअरमन पदासाठी सुरेश गोविंदराव वाघमारे यांची सूचना संचालक ओमेश साहेबराव जपे यांनी मांडली व त्यास दिलीप भीमराज जपे यांनी अनुमोदन दिले व सुरेश गोविंदराव वाघमारे यांची व्हा. चेअरमन पदी निवड करण्यात आली. निवड झाल्यानंतर नूतन चेअरमन राजेंद्र जपे व व्हा. चेअरमन सुरेश वाघमारे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माजी चेअरमन दिलीपराव भीमराज जपे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे श्री परशुराम महाराज यात्रेमध्ये चांगले काम केल्याबद्दल रामदास पाटील आगलावे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी राहत्याचे सहकार अधिकारी बी वाय जाधव, सोसायटीचे सचिव संतोष वाघमारे ,क्लार्क अभिजीत वाघमारे यांच्यासह बाळासाहेब जनार्दन जपे, जिजाबा आगलावे, अशोकराव आगलावे, सोपानराव पवार, आदी मान्यवरांसह सोसायटीचे संचालक ओमेश साहेबराव जपे, कैलासराव सदाफळ, शांताराम जपे, विठ्ठलराव मातेरे, किसनराव जपे,किशोर आगलावे, दिलीपराव जपे, सुनील आगलावे , राजकुमार गडकरी,
सुरेशदादा जपे, तसेच भारत आगलावे, गणेश आगलावे, कैलास पळसे, ऋषिकेश जाधव, संजय आगलावे, आदीसह काही सभासद यावेळी उपस्थित होते.
0 Comments