महावितरणचा अनागोंदी कारभार, ग्राहकांच्या मुळावर





 राहुरी / प्रतिनिधी :  अहिल्यानगर जिल्ह्यात महावितरण कंपनीच्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कारणही तसेच आहे. वीज माणसांच्या मुलभूत गरजापैकी बनली आहे. मात्र महावितरणचा अनेकदा भोंगळ कारभार नेहमीच दिसला आहे वीजेचे बिल नेहमीप्रमाणे उशीरा येते व ग्राहकांना दंडाचा फटका बसतो आहे. यावर सामाजिक कार्यकर्ते शरद तांबे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 

  महावितरणची आधीच उशिरा विज बिले त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून ग्राहक आणि व्यावसायिकांना वितरित झाले मात्र बिले प्राप्त होताच दुसऱ्याच दिवशी त्यावर अंतिम दिनांक असल्याने विनाकारण ग्राहकांना दंडाचा भुर्दंड दंड भरावा लागत आहे.  
   गत महिन्याची वीज बिले महावितरण कंपनीकडून पाच दिवस उशिरा दिले लागोलग वीज देयकाचा अंतिम दिनांक असल्याने ग्राहकांना हा दंडाचा भुर्दंड नाहक  होताना दिसतोय. नेहमीच अनेक ‌कारणे आणि जुजबी कारणे दाखवून ग्राहकांना लुबाडणाऱ्या महावितरण  कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या निष्काळजी पणामुळेच हा दंड वीजग्राहकांना विनाकारण भरावा लागत आला आहे.  या उशीराच्या पाच दिवसांचा हिशेब केला तर यातून दंडाचे लाखो रुपये जमा होतात हा एक प्रकारचा ‌अतिरिक्त ‌चार्ज आहे का? असा प्रश्न प्रवरानगर येथील सामाजिक कार्यकर्ते शरद तांबे यांनी उपस्थित केला आहे. या प्रश्नी महावितरण प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारणार असल्याचे शरद तांबे यांनी सांगितले आहे. 

Post a Comment

0 Comments