टाकळीभान: पत्रकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. समाजामध्ये जनजागृती करून लोकशाही अबाधित ठेवण्याचे काम पत्रकार करत असतो.गावच्या जडणघडणीमध्ये पत्रकारांचा मोलाचा वाटा असून निस्वार्थीपणे समाजाची सेवा करणाऱ्या पत्रकार बांधवांना मानधन व पेन्शन मिळावी यासाठी तालुक्याचे आ. हेमंत ओगले यांच्याकडे गावातील पदाधिकारी मागणी करणार असून हा प्रश्न विधानसभेत मांडावा असा आग्रह धरणार असल्याचे प्रतिपादन अशोकचे संचालक शिवाजीराव शिंदे यांनी केले.
टाकळीभान कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार यांच्या वतीने पत्रकार दिनाचे आयोजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबासाहेब बनकर होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते ज्ञानदेव साळुंके, अशोकचे माजी संचालक मंजाबापू थोरात, नामंकित विधीतज्ञ प्रमोद वलटे, सोसायटीचे चेअरमन एकनाथ पटारे, संत सावता सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब तनपुरे, मार्केट कमिटीचे संचालक मयूर पटारे, विलास दाभाडे, अशोकचे माजी संचालक बापूराव त्रिभुवन,माजी उपसरपंच भारत भवार, सोमनाथ पाबळे, भाऊसाहेब मगर,रोहिदास बोडखे,आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व पत्रकार बांधवांचा उबदार वस्त्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना मंजाबापू थोरात म्हणाले की पत्रकार हा समाजात घडलेल्या घटनेवर लिहित असतो, चांगल्याला चांगलं व वाईटला वाईट म्हणण्याची दानत पत्रकार असते, ज्याप्रमाणे आपण कर्म करतो त्याप्रमाणे पत्रकार लिहीत असतात, त्यामुळे ते एक समाजाचा आरसा असतात. व अशा समाजभिमुख काम करणाऱ्या पत्रकांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे असे ते म्हणाले. याप्रसंगी माजी उपसरपंच भारत भवार, प्रमोद वलटे यांनीही पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या. पत्रकारांच्या वतीने पत्रकार अर्जुन राऊत व बापूसाहेब नवले यांनीआभार मानले. तसेच सर्व पत्रकारांचा टाकळीभान सेवा संस्थेच्या वतीनेही सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रम प्रसंगी श्रीधर गाडे, दत्तात्रय मगर, रावसाहेब वाघुले,मोहन रणवरे, महेंद्र संत ,शिवाजी पवार, संजय पटारे, संजय रणनवरे, महेश लेलकर, तुकाराम बोडखे, सुभाष जगताप, तेव्हा संस्थेचे सचिव रामदास ब्राह्मणे, रघुनाथ शेळके, छोटू बनकर,आदीसह बाजार समितीचे पदाधिकारी कर्मचारी, टाकळीभान सेवा संस्थेचे संचालक, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार मार्केट कमिटीचे संचालक मयूर पटारे यांनी मानले.
0 Comments