नगर विकास व पंचायत राज खाते मिळाल्यानंतर लगेचच ना. जयकुमार गोरे यांची शिर्डी भेट !घेतले साईबाबांचे दर्शन!

शिर्डी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज  मंत्री यांनी नुकतीच शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. साईदर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने प्रशासकिय अधिकारी विश्‍वनाथ बजाज यांनी शाल  व साईमूर्ती देऊन  सत्‍कार केला. 

यावेळी श्री साईबाबा संस्‍थानचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा झाल्यानंतर प्रथम मंत्रिमंडळ विस्तार झाला व त्यानंतर नुकतेच खातेवाटप जाहीर झाले आहे. खाते वाटपामध्ये ना. जयकुमार गोरे यांना ग्रामविकास व पंचायत राज हे चांगले खाते मिळाले आहे. खाते मिळाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी नामदार जयकुमार गोरे हे शिर्डीत येऊन त्यांनी साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले.

Post a Comment

0 Comments