जलसंधारण खाते मिळाल्यानंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रथमच शिर्डीत येऊन घेतले श्री साईबाबांचे दर्शन! साई संस्थांनच्या वतीने करण्यात आला सत्कार!

शिर्डी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्वाचित मंत्र्यांना खातेवाटप झाल्यानंतर शिर्डीचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंधारण हे खाते देण्यात आले. खातेवाटप झाल्यानंतर प्रथमच नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे रविवारी शिर्डीत आले.

 साई मंदिरात जाऊन ना. राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. साईदर्शनानंतर त्‍यांचा श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे व विश्‍वनाथ बजाज यांनी  सत्‍कार केला. यावेळी श्री साईबाबा संस्‍थानचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते.
साई दर्शनानंतर शिर्डीत अनेक कार्यकर्त्यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. सत्कार केला, अभिनंदन केले. चर्चा केली.

Post a Comment

0 Comments