शिर्डी( राजकुमार गडकरी) शिर्डी जवळील कोकमठाण शिवारातील आत्मा मलिक हॉस्पिटल तर्फे एक डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले असून या शिबिरात आत्तापर्यंत 837 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत हे शिबिर येथे चालणार आहे.
येथे या शिबिरांतर्गत अनेक रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. तरी या संधीचा रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. असे आवाहन विश्वात्मक जंगली महाराज आश्रम तसेच आत्मा मालिक हॉस्पिटलचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, आत्मा मालिक हॉस्पिटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नितीन पाटील, व या हॉस्पिटलचे व्यवस्थापक सुनील पोकळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे केले आहे.
या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, आत्मा मलिक हॉस्पिटल तर्फे एक डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर येथे सुरू करण्यात आले असून या शिबिरात रुग्णांसाठी विविध प्रकारच्या चाचण्या व उपचार योग्य दरात व सवलतीच्या दरात उपलब्ध असून या शिबिरामध्ये बीपी ,शुगर तपासणी, त्याचप्रमाणे एक्स-रे ,टुडे इको अंजोओंग्राफी ,आवश्यकतेनुसार आरोग्य तपासणी व प्राथमिक दंतोपचार ,नेत्र तपासणी, लॅब चाचण्या, अशा वेगवेगळ्या आजाराच्या तपासणी व सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध असून एन्जोप्लास्टी अँजिओग्राफी सर्जरी मोफत करण्यात येणार आहे. केस पेपर मोफत आहे. जनरल वार्ड अंतर्गत चार्जेस वर 50% सवलत आहे. हे शिबिर येथे एक डिसेंबर २०२४ पासून सुरु झाले असून आत्तापर्यंत 837 रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे .21 जून 2025 या जागतिक योग दिवसापर्यंत हे शिबिर चालणार असून सुमारे 35 हजार रुग्णां पर्यंत या शिबिराचा लाभ पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अशी माहिती यावेळी या आत्मा मलिक हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील ,व्यवस्थापक सुनील पोकळे व विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाचे व आत्मा मलिक हॉस्पिटलचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीला दिलेल्या या पत्रकात म्हटले आहे.
0 Comments