टाकळीभान ते कमालपुर खराब रस्त्याने केले प्रवाशांचे मनके ढिल्ले नूतन खासदार ,आमदार यांनी लक्ष देण्याची परिसरातील नागरिकांची मागणी




टाकळीभान( प्रतिनिधी:)
 श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान दहा-पंधरा खेडे गावांची बाजारपेठेचे मुख्य केंद्र आहे. 


गोदावरीच्या पलीकडील मराठवाड्यातील गावांना व संभाजीनगर जिल्ह्याला जोडणारा टाकळीभान कमालपुर हा रस्ता दळणवळणाच्या व वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कमालपूर येथे शिख बांधव यांचा गुरुद्वारा व महानुभव पंथांचे मोठे पवित्र देवस्थान, धार्मिक स्थळ असून बाहेर राज्य पर राज्यातून अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात, या मार्गावर अनेक वाहनांची रात्रंदिवस वर्दळ या रस्त्याला असते, परंतु गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचे काम झाले नसून, तो अत्यंत खराब झाला असून त्याची दुर्दशा झाली आहे. सदर कामाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असून या अत्यंत खराब झालेल्या रस्त्यामुळे या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मणके ढिल्ले झाले आहेत. तसेच या रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने, खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन अनेक जण जखमी ही झाले आहेत, त्यामुळे तातडीने या रस्त्याचे काम सुरू करावे.या रस्त्या संदर्भात नूतन खा. भाऊसाहेब वाकचौरे यांना ही काही महिन्यापूर्वी येथील ग्रामस्थांनी निवेदन दिले होते.या रोडचा प्रश्न सोडवावा तसेच नूतन खासदार व आमदार यांनी ही या रस्त्याच्या संदर्भात लक्ष घालून आपल्या निधीतून या रस्त्याचे काम करावे अशी मागणी येथील ग्रामस्थ शिवाजीराव शिंदे, रेवणनाथ कोकणे, अर्जुन राऊत, संजय पटारे, सुजित बोडखे, मच्छिंद्र पटारे, बद्रीनाथ पटारे, संदीप पटारे,दामोदर शिंदे, विकास पटारे, सुदामराव पटारे, रवींद्र पटारे, कल्याण गोरे आदींसह गावातील नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments