आपण ज्याप्रमाणे कर्म करतो त्याप्रमाणेच प्रत्येकाला मिळते त्याचे फळ! त्यासाठी जीवनात चांगले वागणे गरजेचे---ह भ प संजयजी महाराज जगताप

शिर्डी (प्रतिनिधी) या जगामध्ये जगत असताना जे आपण करतो त्याचे फळ आपल्याला त्याप्रमाणे मिळत असते. ते अधिक पटीने मिळत असते. वाईट कर्म केले तर त्याचे वाईटच फळ मिळते व चांगले कर्म केले तर त्याचे अधिक चांगले फळ मिळते. असे हभप संजयजी महाराज जगताप ( भऊरकर) यांनी म्हटले आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की,धान्याचा एक दाणा पेरला  आणि जर निसर्गापासून आपणास एकच दाणा जमिनीतून परत मिळाला असता तर माणसाची काय अवस्था झाली असती ? 
धान्य पेरावं का खावं सुचलं नसतं, अशी परिस्थिती मनुष्याची झाली असती.पण ईश्वरानं माणसासाठी अजब व्यवस्था करुन ठेवली आहे. आपण एक दाणा पेरला की तो शेकडो हजारो दाणे परत देतो.
अगदी निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनात आपण काय पेरत आहोत ? हे महत्त्वाचे आहे. आपण जर जीवन जगताना या विश्वामध्ये
दुःख ,राग , द्वेष पेरत असाल तर निसर्गाकडून शेकडो , हजारो पटीने तेच आपल्याला परत मिळत असते हा निसर्गाचा नियम आहे.आणि आनंद, प्रेम, माणुसकी पेरत असाल तर शेकडो हजारो पटीनेच आपल्याला या नैसर्गिक प्रकृतीकडून आनंद, प्रेम माणुसकी मिळत असते. त्यामुळे आपण जीवनामध्ये चांगलं पेरलं पाहिजे चांगलं उगवतं. चांगले वागले पाहिजे म्हणजे आपल्यालाही इतरांकडून चांगलीच वागणूक मिळते. असं प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प  संजयजी महाराज जगताप (भऊरकर )यांनी म्हटल आहे.

Post a Comment

0 Comments