शिर्डी ( प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी शुक्रवारी शिर्डीला भेट दिली. त्यांनी मंदिरात जाऊन श्री साईबाबा समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. साईदर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी प्र.उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी मदिर विभाग पर्यवेक्षक राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. महायुती विजयी झाली. भाजपाला चांगले यश मिळाले. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी निवडणुका झाल्यानंतर प्रथमच शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी भाजपाचे काही पदाधिकारी, कार्यकर्तेही त्यांच्या समवेत होते.त्याच प्रमाणे
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव व राज्याचे मा.शिक्षण मंत्री मा.श्री.विनोदजी तावडे हे शुक्रवारी शिर्डी येथे सहकुटुंब श्री साईबाबांचे दर्शनाकरिता आले असता त्यांचा भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी शिर्डीचे मा. नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर,अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष अभय आगरकर,भाजपाचे शहराध्यक्ष सचिन शिंदे,मा.नगरसेवक गजानन शेर्वेकर,युवा मोर्चाचे सचिन तांबे,मा.नगरसेवक रवींद्र कोते,रवींद्र गोंदकर,युवा मोर्चाचे शिर्डी शहराध्यक्ष चेतन कोते, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश जाधव,नरेश सुराणा, अनुराग आगरकर,किरण बोरुडे आदीं उपस्थित होत.
0 Comments