शिर्डी (प्रतिनिधी) बीडचा बिहार व्हायला लागला. तो होऊ नये, बीडमध्ये शांतता रहावी. अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असे मत राज्याचे माजी परिवहन मंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी व्यक्त केले.
माजी मंत्री अनिल परब हे शिर्डीला आले होते. त्यांनी मंदिरात जाऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, शिर्डीला आपण नेहमी येत असतो व साईबाबांचे आशीर्वाद घेत असतो .आजही मनोभावे साईबाबांचे दर्शन घेतले .वर्ष संपत आले असून नवीन वर्ष सुरू होत आहे .हे नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धी भरभराटीचे जावो व सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुख समाधान शांती मिळो ,अशी साई चरणी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगत साईबाबांनी विधानसभा निवडणुकीत ज्यांना आशीर्वाद दिले त्यांच्या हातून चांगलं काम व्हावं. विरोधकांनीही चांगल्या सूचना कराव्यात असेही ते यावेळी म्हणाले.
लवकरच महानगरपालिका,व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका होणार आहेत .या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, कोणत्याही निवडणूक या निवडणुका असतात. निवडणुकांना निवडणुका सारखेच सामोरे जावं लागतं. श्रीसाई बाबांच्या कृपेने आगामी होणाऱ्या निवडणुका ही पार करू! असं सांगत त्यांनी कुणी कितीचाही नाराज दिला त्यांना नारा देऊ द्या, आम्ही निवडणुका लढू,व पार करू असे म्हणत बीड घटनेप्रसंगी मंत्र्यांचा राजीनामा मागितला जात आहे. या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, बघू राजकारण आहे. राजकारणात पुढे काय डेव्हलपमेंट होते ते बघू.पण येथे
मी साईबाबांच्या पाया पडण्यासाठी आलो आहे. त्यामुळे राजकीय जास्त बोलणार नाही. असे स्पष्ट करत एक मात्र बीडचे बिहार होऊ नये , असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
0 Comments