सावळीविहीर ते कोपरगाव या राष्ट्रीय महामार्गाचे लवकरात लवकर काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावा --आ. आशुतोष काळे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे प्रत्यक्ष भेटून मागणी!

शिर्डी ( प्रतिनिधी) सावळीविहीर फाटा ते कोपरगाव हा
राष्ट्रीय महामार्ग 752 जी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी बैठक घेऊन या कामातील येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात. अशी मागणी आमदार आशुतोषदादा काळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटून केली आहे .

सावळीविहिर - ते कोपरगाव महामार्गाच्या  कामात येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेण्यात यावी. यासाठी आमदार  आशुतोषदादा काळे यांनी संसद भवन दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीनजी गडकरी  यांची भेट घेऊन या प्रश्नासंदर्भात सविस्तर चर्चा केली व त्यांना  यासंदर्भात एक निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी म्हटले की,
सावळीविहिर - कोपरगाव (राष्ट्रीय महामार्ग 752जी) या रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरु असुन त्यामुळे प्रवास करण्याऱ्या नागरिकांना, वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे तसेच अपघात होत आहेत. ह्या रस्त्याच्या कामासाठी येत असलेल्या अडचणी सोडवुन या रस्त्याचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्यात यावे .यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसह बैठक आयोजित करण्यात यावी व  त्यावर तोडगा काढण्यात यावा.अशी मागणी  आमदार  आशुतोषदादा काळे यांनी मा.ना.श्री. नितीनजी गडकरी  यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments