टाकळीभान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना जंताच्या गोळ्यांचे वाटप...



टाकळीभान( प्रतिनिधी-:)
 टाकळीभान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वस्तीशाळा, अंगणवाडी गावातील विविध शाळांमध्ये एक वर्ष वयापुढील शालेय विद्यार्थ्यांना जंताच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. 

   याप्रसंगी न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान माध्यमिक विद्यालय येथे औषधांचे वाटप करताना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम बोरुडे, आरोग्य सेविका अलका गायकवाड, विद्यालयाचे प्राचार्य बी. टी.इंगळे, उपप्राचार्य बनसोडे , शिंदे मावशी आदी उपस्थित होते. 
    यावेळी डॉ. बोरुडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपण शालेय मैदानामध्ये खेळताना आपल्या हाताला माती, जंतू चिकटतात, तसेच गोड खाण्यामुळे, दूषित पाण्यामुळे पोटामध्ये जंतू तयार होतात, पोटांचे विकार यांचा नायनाट करण्यासाठी या जंताच्या गोळ्या मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. यासाठी ही औषधे मुलांनी घ्यावीत. या औषधे वाटपासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळीभान येथील आरोग्य सहाय्यक श्री खाडे, श्रीमती फासे सिस्टर, सौरभ पवार, अभिनय नागले आदींनी या वाटपासाठी परिश्रम घेतले व गावा मध्ये विविध शाळा ,वस्ती शाळा अंगणवाडी या ठिकाणी जंताच्या गोळ्यांच्या औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व विद्यालयांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या टीमचे आभार व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments