आदर्श पत्रकार नंदकुमार बगाडे

खुपच सुंदर. 
पत्रकारीता हा लोकशाहीचा चौथा खांब आहे. आणि तुम्हाला (बगाडे पाटील) पाहिले की त्या चौथ्या खांबाची आठवन होते. 

आणि आठवण ही का होऊ नये म्हणतो मी ,
 अनेक सेवाभावी संस्थांनाकडून एक उत्कृष्ट आणि आदर्श पत्रकार म्हणून  आपला गुणगौरव झाला, याचा पारगाव सुद्रिक च्या सर्व व्रुत्तप्रेमींना सार्थ अभिमान आहे.एवढं अमुल्य रत्न पारगाव च्या मातीतून  अंकुरीत व्हावं आणि त्याची यत्किंचितही कल्पना गावाला नसावी असं कसं बरं होईल. आपली वाक्यरचना व (शुद्ध) लेखन पाहून वाचकांच्या नयन पटलावरील अज्ञानाची झालर गळूनचं पडली. शाळेत मडके सरांनी आम्हाला मराठी व्याकरण शिकवले. पण त्या व्याकरणाशी तुमच्या या लेखाची जुळवाजुळव करताना माझी जी दमछाक झाली ती न सांगितलेली बरी. 
 म्हणतात ना "काखेत कळसा अन् गावाला वळसा"," पिकतं तिथं विकत नाही", "कोकणात नारळ फुकट". या म्हणी अगदी  तुमच्याकडे पाहुनच लिहील्या असाव्यात असं वाटतं. तालूक्यात नव्हे तर जिल्ह्यात एवढा नावलौकिक मिळालेला पत्रकार आपल्या गावाला लाभला हे गावाचं भाग्यच समजतो मी. पण गावाला त्याचं महत्त्व समजलं नाही. एखाद्या मौल्यवान हिऱ्याची खरी किंमत ही एक  रत्नपारखीच करु शकतो.परंतु तुमच्या सारख्या हिऱ्याला तो रत्नपारखी अशा गावात मिळणे म्हणजे दैवदुर्विलास च  म्हणावा लागेल. अनेक सेवाभावी संस्थांनी  पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन तुमचा नव्हे तर पुर्ण गावाचा गुणगौरव केला, व हे नयनरम्य दृश्य ,"याची देही याची डोळा" आम्हाला पहायला मिळाल्याने आमचे जीवन सार्थक झाले.
आपल्या याच सद्गुणांचा, व सद् विचारी व्रुत्तीचा वापर करून आपल्याच गावातील  विकास कामांचा आढावा घ्यावा . व त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास आपण त्या संबंधित लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणून द्याल व पत्रकारीता ही फक्त जीवंतच नाही तर तुमच्या सारखी तेजस्वी व धारदार आहे याची जाणीव पारगावकरांना करुन द्याल अशी मी खात्री बाळगतो. 
गावात अनेक विकासकामे ही प्रलंबित आहेत.
उदा.१  ५ कोटींचा खर्च करून देवाला मोठं मंदिर बांधले पण त्याच देवाच्या पालखी मार्गाची दुरावस्था आहे.
२.गावातील स्मशानभूमीचे अपूर्ण राहिलेले काम .
३.नवीन ग्रामीण जलजीवन मिशन .
४.पारगाव ते खेतमाळीस वाडी 
५. वीजेचा प्रश्न 
६. रस्त्याची झालेली दुरावस्था.
अशी एक ना अनेक कामे अजून असतील. एक उत्कृष्ट पत्रकार व सह संपादक म्हणून आपण या प्रश्नांना वाचा फोडून गावातील लोकांना आपल्या पत्रकारीतेची ताकद दाखवून द्याल अशी आशा बाळगतो.
आणि हो एवढे गूणवंत व नामवंत पत्रकार व सह संपादक बगाडे पाटील यांचा जवळजवळ जीवनपट च गावाला ज्ञात करून दिल्या बद्दल पत्रकार दिलीप कुसाळकर यांचे ही गावच्या वतीने मनस्वी आभार व्यक्त करतो. 
 व बगाडे पाटील आपणास पुढील वाटचालीसाठी गावाच्या वतीने हार्दिक  शुभेच्छा 

Post a Comment

0 Comments