सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि धार्मिक अशा सर्व क्षेत्रात नेहमी सक्रिय असणारे-- अशोकराव श्रीपतराव जमधडे पा.आज वाढदिवसानिमित्त त्यांचेवर सर्व क्षेत्रातून होत आहे शुभेच्छांचा वर्षाव!

शिर्डी( प्रतिनिधी)
राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व सावळीविहीर खुर्द येथील माजी सरपंच तसेच एक लोकप्रिय नेतृत्व श्री अशोक राव श्रीपतराव जमधडे पाटील यांचा आज 30 डिसेंबर सोमवार रोजी वाढदिवस असून त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून व विविध मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

   राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथील अशोकराव श्रीपतराव जमधडे पा. हे सावळीविहीर खुर्द परिसरातील अनेक वाड्या, वस्त्या  व आसपासच्या गावांमधून एक लोकप्रिय नेतृत्व समजले जाते. शांत, संयमी, मितभाषी व सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये नेहमी सक्रिय असणारे अशोकराव यांना सर्वजण आबा या नावानेच संबोधतात. राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते जवळचे व निष्ठावान असे कार्यकर्ते समजले जातात. सावळीविहीर खुर्द चे सरपंच असताना त्यांनी विविध विकास  कामे  गावात राबवली. त्याचप्रमाणे राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदावर असताना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमुलाग्र बदल त्यांनी घडवून आणले होते. अशोकराव( आबा) हे पदवीधर असून संपूर्ण कुटुंब ही सुशिक्षित, सुसंस्कृत असे आहे. त्याचप्रमाणे ते एक बागायतदार शेतकरी आहेत. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना राजकीय क्षेत्राची एक आवड होती. महाविद्यालयीन सी आर व  जी एस, एल आर  च्या निवडणुकीतही त्यांचा सक्रिय सहभाग असायचा, तसेच कबड्डी क्रिकेट आदी क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांना मोठा इंटरेस्ट होता.  धार्मिक क्षेत्रामध्ये  त्यांचा मोलाचा वाटा असतो. सावळी विहीर खुर्द येथील हरिनाम सप्ताह असो किंवा गणेश उत्सव, नवरात्र उत्सव ,श्री भवानी माता देवीची यात्रा असो, श्री लमाण बाबाची यात्रा असो यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. अशोकराव आबांचा स्वभाव, शांत व सर्वांशी मिळून मिसळून वागणारा आहे. त्यामुळे गावातील व पंचक्रोशीतील लहान-मोठे गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांशीही त्यांचा नेहमी विविध कारणांनी संबंध येत असतो. त्यांचे सर्वांशीच आपुलकीचे ,स्नेहभावाचे संबंध आहेत. राजकारण करताना हा आपला व तो विरोधक असा भेदभाव कधीही ते करत नाहीत. त्यामुळेच त्यांना एक लोकप्रिय असे परिसराचे व्यक्तिमत्त्व नेतृत्व समजले जाते. अशा लोकप्रिय नेतृत्व व्यक्तिमत्व असणाऱ्या अशोकराव (आबा) श्रीपतराव जमधडे पा. यांचा आज सोमवारी 30 डिसेंबरला वाढदिवस असून त्यांना अनेकांकडून प्रत्यक्ष भेटून सत्कार करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर मोबाईलवर त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत व वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात येत आहे. सर्व क्षेत्रामधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दैनिक छत्रपती एक्सप्रेस परिवाराच्या वतीनेही त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक सदिच्छा आहेत. त्याचप्रमाणे येणारे सन 2025 हे नवीन वर्ष सुख समृद्धीचे, भरभराटीचे, उत्तम आरोग्याचे, आनंदाचे जावो अशा शुभेच्छा आहेत.

Post a Comment

0 Comments