आझाद क्रीडा मंडळाचा खेळाडू पृथ्वीराज गलांडे याची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

टाकळीभान (सत्तेचा  महासंग्राम न्युज)

नुकत्याच अकोला जिल्हा क्रीडा संकुल येथे १९ वर्षे वयोगटातील मुला- मुलींच्या गटातील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा २७ ते २९ नोव्हेंबर रोजी पार पडल्या. 
या स्पर्धेमध्ये टाकळीभानचा भूमिपुत्र आझाद क्रीडा मंडळाचा कबड्डी खेळाडू पृथ्वीराज गलांडे याची महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली असून पुढील 
हरियाणा येथे होणाऱ्या १९ वर्षीय शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये हा आझाद क्रीडा मंडळ टाकळीभानचा कबड्डी खेळाडू पृथ्वीराज गलांडे हा महाराष्ट्र संघातर्फे खेळणार आहे. त्याची महाराष्ट्र कबड्डी संघात निवड झाल्याबद्दल त्याला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक रवींद्र गाढे ,महेश कोल्हे ,अक्षय थोरात व सर्व आझाद क्रीडा मंडळाचे सदस्य, क्रीडा प्रेमी व टाकळीभान येथील पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी गलांडे याचे निवडीबद्दल अभिनंदन व कौतुक केले आहे.

Post a Comment

0 Comments