शिर्डी (प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदी विराजमान होत असल्याचा आनंद भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राज्यभर होत असून शिर्डीतही भाजप कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला.
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी आज गुरुवारी शपथ घेतली .त्यानिमित्ताने शिरडी च्या साईबाबांचे त्यांना आशिर्वाद लाभावेत. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना राज्याचा अधिकाधिक विकास व प्रगती करण्यासाठी समर्थ व शक्ती साईबाबांनी द्यावी यासाठी साईबाबांना भाजप कार्यकर्त्यांनी मनोभावे प्रार्थना केली.व यासाठी मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वतीने शिरडीचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व भारतीय जनता पार्टी शिर्डी शहराच्या वतीने शिर्डी येथे मंदिरात साईसमाधीस महावस्त्र अर्पण केले. यावेळी शहराध्यक्ष सचिन शिंदे,माजी नगरसेवक गजानन शेर्वेकर,विनोद संकलेचा, सुजित गोंदकर, मंगेश त्रिभुवन, अशोक गोंदकर,गणेश जाधव,पंडित गुडे,सोमराज कावळे,मंगेश खांबेकर विनायक रत्नपारखी ,विजय गोंदकर आदिंसह मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर शिर्डीत भाजपाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.
0 Comments