महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचाराचा नारळाचा शुभारंभ लोहगाव येथे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न.

लोहगाव (सत्तेचा महासंग्राम न्युज)

राहाता तालुक्यातील लोहगाव येथील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचाराचा व नारळाचा शुभारंभ संपन्न झाला.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस पाटील वसंतराव चेचरे व ॲड ‌बाबासाहेब चेचरे यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी एकवीस जणांच्या  शुभहस्ते नारळ फोडण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित सर्व गावातील कार्यकर्त्यांना चिन्हांची टोपी व शाल देण्यात आली.


यावेळी माजी संचालक भाऊसाहेब चेचरे. पंकज भालेराव .अकबर शेख .महेश सुरडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्या गावचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला  आहे.त्यांनी विकास करताना कुठलीही जात पात बघितली नाही सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे त्यांची नेतृत्व असल्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे व इथून पुढे होणार आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांना जागृत राहून त्यांना आपल्या गावातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य देण्याची आपल्या सर्वांवर जबाबदारी आहे. आपली ओळख ही आपल्या गावावरून निर्माण होते आपल्या गावचा विकास हा आपल्या गावातील नागरिकांनी बाहेरच्या गावात सांगावा अशा पद्धतीने आपले काम चालू आहे व इथून पुढेही चालूच राहणार आहे.
यावेळी लोहगाव ग्रामपंचायतीचे सरपंच. उपसरपंच सदस्य  सोसायटीचे चेअरमन व चेअरमन व सदस्य तंटामुक्तीचे अध्यक्ष उपाध्यक्ष माजी सरपंच उपसरपंच त्याचबरोबर गावातील  सर्व संस्थांचे पदाधिकारी  त्याचबरोबर मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

 

Post a Comment

0 Comments