आम्ही लुंग्यासुंग्यांच राजकारण करत नाही, सर्वसामान्य माणसांच्या जीवावर राजकारण करणारे आहोत---डॉक्टर सुजय विखे पाटील.

शिर्डी ( प्रतिनिधी) हम किसी का उधार नही रखते,आज सगळ्यांचा हिशोब केला, राहिलेल्यांचा नंतर पाहू,असं सांगत टायगर अभी जिंदा है, असं म्हणत
गेली तीन-चार महिने सगळे आरोप सहन केलेत, सगळा गलिच्छपणा सहन केला, शांतचित्ताने बसून राहिलो. शांतचित्ताने बसून पारनेर वाल्याला कस गाडायचं तेही गाडल, तो ज्याच्या जीवावर उड्या मारत होता त्या संगमनेरवाल्याला पण गाडलं .जे उरलेत त्यांचा आता नंतर हिशोब पाहू, असं म्हणतं सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
 
युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विजयी सभेत बोलत होते. यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सौ शालिनीताई विखे पाटील ,माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील त्याचप्रमाणे विविध मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
 यावेळी डॉक्टर सुजय विखे पुढे म्हणाले की,हम किसी का उधार नही रखते ! आज सगळ्यांचा हिशोब पूर्ण केल्यानंतरच सुजय विखे येथे आलेला आहे.
ज्या-ज्या लोकांनी हा चंग बांधला होता की विखे पाटील परिवाराचा नामोनिशान मिटवू त्या सगळ्यांना संपवल्यानंतर सुजय विखे पाटील स्टेजवर आलाय. अरे हे काही लुंग्यासुंग्याचं राजकारण नाही, सर्वसामान्य माणसाच्या जीवावर राजकारण करणारे आम्ही आहोत. ज्या लोकांना वाटत होत मी उगीच बोलू राहिलो पण त्या लोकांना आज कळलं ना की टायगर अभी जिंदा है ! सर्वसामान्य माणसाच्या आशीर्वादाने आज लागलेला हा निकाल त्या सगळ्या लोकांनाच चपराक आहे जे या ठिकाणी अपप्रचार करून, या ठिकाणी लोकांमध्ये गैरसमज पसरवून सर्व समाजामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करत होते. हा विजय सर्वसामान्य माणसाचा आहे, आजचा हा विजय या मतदारसंघातील गोरगरीब युवकांचा आहे, आजचा हा विजय आमच्या लाडक्या बहिणींचा आहे. म्हणून मी आज नामदारसाहेबांना एक विनंती करेन की साहेब हा जो विजय आपल्याला मिळाला, ज्यामध्ये सगळ्यांचे कष्ट होते, प्रत्येक परिवाराचा सदस्य, प्रत्येक संस्था यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन प्रवराचे राजेंद्र विखे पाटील साहेबांचे देखील यामध्ये कष्ट होते. या विजयी सभेला मोठ्या प्रमाणात मतदार, महिला ,युवक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments