सावळीविहीर येथे राधाकृष्ण विखे पा. विजयी झाल्याबद्दल व डॉ.सुजय विखे पा. यांच्या वाढदिवसानिमित्त विजयोत्सव साजरा!

सावळीविहीर (प्रतिनिधी)
शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या बद्दल तसेच डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तसावळीविहीर बुद्रुक येथे मोठा विजय उत्सव साजरा करण्यात आला. 

नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे विजया निमित्त व सुजय दादा विखे पाटील यांचे वाढदिवसानिमित्त अभिनंदन करण्यात आले.
  दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी राहता तहसील कार्यालयात शिर्डी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील हे विजयी झाल्याचे घोषित होताच सावळीविहीर येथील कार्यकर्त्यांनी राहता येथून सावळीविहीर येथे येऊन छत्रपती स्मारकाजवळ एकत्रितपणे जल्लोष साजरा केला. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. श्री छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. गुलाल उधळत, फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. 

यावेळी सरपंच महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे यांनी
शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील यांचा विजय झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत सावळीविहीर व परिसराचाही या विजयामध्ये मतदारांचा  खारीचा वाटा आहे. सर्वच संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मतदार यांनी गेले काही दिवस रात्रंदिवस प्रचार केला, मेहनत घेतली ,परिश्रम घेतले.व राधाकृष्ण विखे पाटील यांना विजयी केले. त्यामुळे मतदारांचेही त्यांनी यावेळी आभार मानले. तर सरपंच ओमेश जपे यांनी राधाकृष्ण विखे पाटील हे आठव्यांदा विजयी झाले आहेत. राज्यात परत महायुतीचे सरकार येणार असून विखे साहेब हे परत मंत्री होणार आहेत. जनतेने विकासाला साथ दिली. महायुतीच्या धोरणाला शिक्कामोर्तब केलं. लाडक्या बहिणीने सुद्धा या विजयात मोठी साथ दिली. या सर्वांचे त्यांनी आभार मानत नामदार विखे पाटील यांचे गावाच्या वतीने अभिनंदन केले. व राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याचे मुख्यमंत्री होवो ,अशी सर्वांची इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी मत व्यक्त केले. यावेळी पोलीस पाटील सुरेश वाघमारे यांनी विरोधक संविधान बदलणार अशा वल्गना करीत होते .मात्र असे होणार नाही हे जनता जनार्दनाला माहीत होते . सर्व मागासवर्गीय व बहुजन समाज राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मागे होता व त्यांना विजयी केले नामदार साहेबांचे सर्व बहुजन समाजाच्या वतीने अभिनंदन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे रविवारी 24 नोव्हेंबर 2024 रोजी माजी खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांचा वाढदिवस असून तोही येथे मोठ्या उत्साहात पेढे वाटून साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे जनसेवा कार्यालयात लोणी येथे जाऊन डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.यावेळी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे , उपसरपंच विकास जपे, जिजाबा आगलावे,गणेश आगलावे, दत्तू आगलावे, आशिष आगलावे किशोर आगलावे, गणेश कापसे, कैलास सदाफळ, संतोष गायकवाड, संजय जपे ,राजेंद्र आगलावे, प्रदीप नितनवरे, गणेश बनसोडे, सागर पगारे , शुभम कोठारी,सोपान पवार, सुनील आगलावे ,शिवाजी आगलावे, कैलास पळसे, राजू कापसे, बंटी जाधव, आदी कार्यकर्ते, ग्रामपंचायत  व सोसायटीचे पदाधिकारी ,विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments