शिर्डी( प्रतिनिधी)
शिर्डीतील माझा विजय हा मतदार संघातील जनतेला आपण समर्पित करत असून हा विजय महायुतीच्या धोरणावर शिक्कामोर्तब करणारा व पंतप्रधान नरेंद्र मोदीं वर विश्वास ठेवणारा असा विजय आहे. असे मत शिर्डी विधानसभा मतदारसंघातून नुकतीच विजयी झालेले महायुतीचे उमेदवार आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील हे महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. विजयी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेने ही महायुतीला चांगला कौल दिला आहे, राज्यातही महायुतीच्या धोरणावर जनतेने शिक्कामोर्तब केले असून नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून अमित शहांवर विश्वास ठेवून जनतेने महायुतीला चांगला कौल दिला आहे .त्यामध्ये लाडक्या बहिणींचा आशीर्वाद व शुभेच्छाही महत्त्वाच्या ठरल्या आहेत. असे सांगत शरद पवारांबद्दल विचारता शरद पवारांची राज्यातील विश्वासाहर्ता संपलेली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे संजय राऊत यांच्या संदर्भात बोलताना महाविकास आघाडीने आता संजय राऊत यांच्यासारखे ओझे किती दिवस सांभाळायचे हा विचार केला पाहिजे. असा टोमणाही यावेळी मारला. संगमनेरचे नेते शिर्डी मध्ये दहशतीचे झाकण उघडायचे असे म्हणत होते .मात्र संगमनेरच्या जनतेने त्यांचेच दहशतीचे झाकण फेकले आहे. माझी व डॉक्टर सुजय विखे यांची त्यांनी बदनामी केली .मात्र जनतेने ते ओळखले होते. नेता कोणी मोठा नसतो. जनता जनार्दनच श्रेष्ठ असते. विरोधकांकडे बोलघेवडे नेतेच जास्त आहेत.असे सांगत राज्याचा मुख्यमंत्री हे पक्षश्रेष्ठीच ठरवणार, तेच निर्णय घेणार आहेत, मात्र आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत .मात्र नरेंद्र मोदी साहेबजे निर्णय घेतील, तोच मुख्यमंत्री होईल .असेही त्यांनी यावेळी सांगितलं. आणि आपला हा विजय झाला हा जनता जनार्दनामुळे झाला .त्यांचे मोठे ऋण आहे .त्याचप्रमाणे आमच्या मातोश्री व पिता पद्मश्री यांच्या कामाची ही पावती आहे. त्याचप्रमाणे मुलगा डॉक्टर सुजय विखे यांनी खूप परिश्रम घेतले. त्याचेही हे फळ आहे. असे सांगत माझा हा विजय शिर्डी मतदार संघाच्या सर्व जनतेला समर्पित करीत असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
0 Comments