वृक्षसंवर्धन हा जगण्याचा ध्यास : प्रमोद मोरे




श्रीरामपूर : (सत्तेचा महासंग्राम न्युज)
वृक्षसंवर्धन आणि प्रदूषण निवारण हा माझ्या जगण्याचा ध्यास असून याचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे मत निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे व्यक्त केले. श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथील श्री खंडेश्वर माध्यमिक विद्यालयात मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच वृक्षारोपण व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

 वृक्षमित्र स्वर्गीय आबासाहेब मोरे यांनी सुरू केलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे महाराष्ट्रभर विविध जिल्ह्यांमध्ये वर्षभर अनेक उपक्रम सुरू असतात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सहसचिव श्री संजय गायकवाड यांनी केले. यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील श्री खंडेश्वर माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमप्रसंगी प्रमोददादा मोरे यांनी सांगितले की, पर्यावरण हा प्रत्येकाच्या जगण्याचा भाग असून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने आपापल्या घराभोवती अथवा परिसरात वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमप्रसंगी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचे पाईक व्हावेत. वृक्षसंवर्धन आणि प्रदूषण निवारण हा माझ्या जगण्याचा ध्यास असून याचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.  त्यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापक श्री रवींद्र पवार, शिक्षक श्री देविदास खेडकर, श्री अमोल जाधव यांच्यासह आदीजण उपस्थित होते. आभार श्री संजय नेटके यांनी मानले.

Post a Comment

0 Comments