सावळीविहीर (प्रतिनिधी) विधानसभा निवडणूक आली की गावात यायचे, त्यानंतर मात्र परत कधी गावात यायचं नाही, विकासाची कोणती दिशा नाही. अशा उमेदवारांना आपण निवडून देऊन उपयोग नाही . अशी विरोधकांवर टीका करत आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त विकास कामे करणाऱ्या ना. राधाकृष्ण विखे पा. यांना सर्व गट तट सोडून सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे आवाहन सरपंच महासंघाचे राज्यउपाध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे यांनी केले.
तर गावातील प्रत्येक कुटुंबाला ना. विखे पाटील यांनी कोणत्या ना कोणत्या योजनेतून सहकार्य केले आहे . आपला पक्ष विखे पक्ष आहे. त्यामुळे गावात असणाऱ्या त्या ४-५ विरोधकांचे ऐकू नका, दरवेळी नवीन उमेदवार
येणार, भाषण ठोकणार !पाच वर्षे परत येणार नाही, अशा उमेदवाराला निवडणुकीत थारा देऊ नका व ना. विखे यांच्या पाठीमागे सर्वजण भक्कमपणे उभे रहा, असे आवाहन सरपंच ओमेश साहेबराव जपे यांनी केले.
राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे महायुतीचे उमेदवार भाजपचे ना.राधाकृष्ण विखे पा. यांच्या निवडणूक प्रचाराचा नारळ श्री हनुमान मंदिरात फोडून शुभारंभ करण्यात आला .यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे, उपसरपंच विकास जपे, अशोकराव जमधडे,अ.फ.शेख गुरुजी,
जिजाबा आगलावे, गणेश आगलावे, गणेश कापसे, सोपान पवार, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब जपे म्हणाले की, गोदावरीच्या कालवे दुरुस्तीसाठी 191 कोटी रुपये मंजूर केले. त्यामुळे शेतकऱ्यांना वीस दिवसात पाणी मिळणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना , श्रावण बाळ, घरकुल,आदी योजना त्यांनी गावात मोठ्या प्रमाणात राबवल्या. त्यामुळे आपणही गटतट गावात न बघता एक दिलाने काम करावे, आता निवडणुकीत कोणी येईल काहीतरी सांगेल त्यावर विश्वास ठेवू नका ,1980 पासून विधानसभा निवडणुकीत येथे प्रत्येक वेळी वेगळा उमेदवार असतो, तो काय विकास साधणार,? गावातील प्रत्येक मतदाराने जास्तीत जास्त मतांनी ना. विखे पा. यांना निवडून द्यावे,व मागील वेळी निमगाव जाळी प्रमाणे आपल्या गावानेही यावेळी जास्त मताने विखे पाटील निवडून येतील असा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तर सरपंच ओमेश जपे यांनी यावेळी सांगितले की, ना. विखे पा. यांच्यामुळेच गावाला सव्वीस एकर जमीन मिळणार आहे. अनेकांची पुनर्वसन तेथे होणार आहे. विखे पाटील यांना मागील वेळी गावाने लीड दिले. त्यामुळे गावात पाच वर्षे चांगले कामे झाली. त्यामुळे गावातील चार दोन विरोधकांची ऐकू नका, दर निवडणुकीवेळी नवीन उमेदवार येईल, येथे भाषण देईल ,त्यावर विश्वास ठेवू नका ,जास्तीत जास्त मतांनी विखे पाटील यांना निवडून द्या, आपला पक्ष म्हणजेच विखे पक्ष आहे, कमळाला मतदान करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी सावळीविहीर खुर्द येथील मा. सरपंच अशोकराव जमधडे यांनी ना. विखे पा.यांचे काम राज्यात अग्रेसर आहे. शिर्डी मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांचा मोठा वाटा आहे. शिर्डी मतदारसंघातून सर्वाधिक मतांनी निवडून येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी बंटी यांनी ना. विखे पा.हे सर्व समाजाचे नेते आहेत. सर्वांचीच ते कामे करतात . त्यामुळेच ते आज सर्वच ठिकाणी एक नंबर नेते आहेत व त्यांना गावातून एक नंबरचे लीड देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी सोपान पवार,व कार्यकर्त्यांची भाषणे झाली. त्यानंतर प्रचाराचा नारळ मंदिरात वाढवून गावातून घोषणा देत, हातात भाजपाचे झेंडे घेत प्रचारफेरी काढण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सोसायटीचे चेअरमन,व्हा.चेअरमन, संचालक, सर्व संस्थांचे, संघटनांचे, पदाधिकारी, ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments