विरोधकांच्या अफवा व भूलथापांना बळी पडू नका, हरियाणा प्रमाणेच महाराष्ट्रातही महायुतीचेच सरकार येणार----माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पा.

सावळीविहीर (प्रतिनिधी) विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका, निवडणूक आली की विरोधक येणार! परत पाच वर्ष बघणार नाही! मात्र नामदार विखे पाटील हे सातत्याने या परिसराच्या विकासाचे व्हिजन ठेवून काम करत आहेत.

सावळीविहीर व परिसरात एमआयडीसी व पशु वैद्यकीय महाविद्यालय ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झाली असून त्यामुळे येथील तरुणांना मोठा रोजगार मिळणार आहे. ना. विखे पा. यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून येथे मोठा विकास साधण्याचा प्रयत्न केला व आणखी पुढील पाच वर्षात विकास करण्यासाठी ना. राधाकृष्ण विखे पा.यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन मा. मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी केले.
सावळीविहीर येथील मातेरे पाटील वस्तीवर त्यांनी नुकतीच सावळीविहीर परिसरातील कार्यकर्ते, मतदार यांची बैठक घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सावळीविहीर  येथील ज्येष्ठ नेते व मा.पं.स. सदस्य साहेबराव जपे, डॉक्टर धनंजय धनवटे,सरपंच महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब जनार्धन जपे, सरपंच ओमेश जपे, राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे, उपसरपंच विकास जपे, पं.स. चे मा. सभापती जिजाबा आगलावे, गणेश आगलावे, गणेश कापसे, शिवाजी आगलावे, सोपान पवार, बाबा मातेरे, विठ्ठल मातेरे, संजय मातेरे, कैलास सदाफळ,आदीं मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी अण्णासाहेब म्हस्के पुढे म्हणाले की, सावळीविहीर येथील कारखाना बंद पडला, शेती महामंडळ उध्वस्त झाले, त्यामुळे येथील रोजंदारी गेली. मात्र नामदार विखे  यांच्या प्रयत्नामुळे हळूहळू येथे विविध विकास कामे होऊन सुधारणा होऊन विकास होत आहे. येथील झोपडपट्टी वासियांना जागा देऊन घरकुले देऊन पुनर्वसन करण्याचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे येथे एमआयडीसी साठी शेती महामंडळाची पाचशे एकर जमीन देण्यात आली असून येथे मोठे मोठे कारखाने येणार आहेत. मुंबई पुणे प्रमाणे येथे तरुणांना काम करण्याची संधी मिळणार आहे ‌. छोटे मोठे रस्ते त्यामुळे होणार आहेत. येथे नागपूर नंतर सावळीविहीर येथे पशु महाविद्यालय होणार असून शेतकरी, पशु मालकांना त्याचा फायदा होणार आहे. राजकीय वजन वापरून ना. विखे पा. यांनी येथे विकास साधण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. निळवंडे धरण व त्यांच्या कालव्याच्या नूतनीकरणासाठी ना.विखे पा. यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे हा जिरायती भाग बागायती होणार आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. असे सांगत विरोधक अफवा पसरवतात, मीडियामध्ये निगेटिव्ह बातम्या देतात, यावर विश्वास ठेवू नका, हरियाणातही अशाच अफवा पसरल्या होत्या मात्र तेथे भाजप व मित्र पक्षाचेच सरकार आले. सावळीविहीर व परिसर हा नेहमी  ना.विखे यांच्या पाठीमागे उभा राहिला आहे. प्रत्येक वेळी या भागाने ना. विखे यांना मताधिक्य दिले आहे. मागील वेळी 78 हजार मतांनी ते विजयी झाले होते. मोठं मताधिक्य यावेळीही या परिसराने द्यावे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची शिवसेना तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची राष्ट्रवादी आपल्याबरोबर आहे.सगळ्यांना बरोबर घेऊन जास्तीत जास्त मतदान घडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनीही प्रयत्न करावेत. असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. याप्रसंगी साहेबराव जपे, जिजाबा आगलावे ,बाळासाहेब जपे, आदींसह नेत्यांची भाषणे झाली. यावेळी अ.फ.शेख गुरुजी, विठ्ठलराव कापसे, मोहनराव मोरे, दिलीप शेठ बाटिया, राजेंद्र आगलावे, दत्तू आगलावे,सुरेश वाघमारे, निनाद मातेरे, निलेश आरणे, आनंद जपे, मोहनराव कापसे, शरद गडकरी,प्रदीप नितनवरे, प्रभाकर जपे ,भारत नेतकर, प्रमोद कोपरे, कैलास पळसे,सुनील आगलावे,भारत आगलावे, किरण आगलावे, सागर पगारे, रतन गायकवाड, दोडिया, राजू कापसे ,महेश जपे ,विलास कदम ,भैय्या जपे, स्वप्निल पारडे,बाळासाहेब सदाफळ, बंटी जाधव, सुरेश वाघमारे,आदींसह ग्रामपंचायत, सोसायटी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments