शिर्डी( प्रतिनिधी) राजकुमार गडकरी
राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र पुणतांबा येथे श्री कार्तिक स्वामींचे प्रसिद्ध व पुरातन असे मंदिर असून या मंदिरामध्ये कार्तिक पौर्णिमा व कार्तिक नक्षत्रावर महिलांना दर्शनासाठी प्रवेश असतो. दिनांक 15 नोव्हेंबर 2024 शुक्रवार रोजी कार्तिक पोर्णिमा व नक्षत्रावर येथे मोठी यात्रा भरणार असून लाखो भाविक, महिला यावेळी येथे दर्शनासाठी येणार असल्यामुळे व मोठी यात्रा भरणार असल्यामुळे येथील भक्त मंडळ व ग्रामस्थांनी यात्रेसाठी मोठी सोयी सुविधा उपलब्ध करून यात्रेचे मोठे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीक्षेत्र पुणतांबाला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. येथे योगीराज संत चांगदेव महाराज यांचे संजीवन समाधी आहे. त्याचप्रमाणे विविध मंदिरे असून अहिल्याबाई होळकर यांनी गोदावरी तीरी घाट बांधलेला आहे. त्याचप्रमाणे श्री कार्तिक स्वामींच्या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केल्याचे म्हटले जाते. श्री कार्तिक स्वामींच्या दर्शनाला महिलांना कार्तिक नक्षत्रावरच परवानगी असते .असे समजले जाते. त्यामुळे पंधरा नोव्हेंबरला येथे महिलांची दर्शनासाठी मोठी गर्दी होणार आहे .श्री कार्तिक स्वामींना मोरांचे पीस ,रुद्राक्ष, नारळ आदी वाहिले जाते. येथील भाविक व ग्रामस्थांनी यात्रेनिमित्त येथे साफसफाई, विद्युत रोशनाई तसेच भाविकांसाठी विविध सोयी सुविधा निर्माण केल्या असून यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. यावर्षी कार्तिक नक्षत्राचा पर्व काळ शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 9. 55 ते शनिवार पहाटे 2 .59 असा आहे. असे सांगितले जाते.
0 Comments