टाकळीभान प्रतिनिधी-- श्रीरामपूर, तालुक्यातील कमालपूर येथून शनिदेवगाव (ता. गंगापूर) येथे एकाच दुचाकीवरन जाणारे चौघे कमालपूर येथील कोल्हापूर टाईपच्या बंधाऱ्यावरून तोल जाऊन पडले. यातील एका जणास नदीत मासे पकडणार्या काही तरुणांनी वाचवले.तर इतर मृतांपैकी एका वृद्धेचा मृतदेह सापडला असून अन्य दोघांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. आज (ता. ११) सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कमालपुर (ता. श्रीरामपूर) येथील आदिवासी समाजातील दिलीप सोमनाथ बर्डे (वय-३२),रवी सोमनाथ बर्डे (वय-३१),मॅचिंद्र गोपीनाथ बर्डे (वय ४५) व यनुबाई मनोहर बर्डे (वय ७६) असे तीन तरुण व एक वृद्ध महिला चौघेजण कमालपूरवरून शनिदेव गाव (ता. गंगापूर) येथे मृत वृद्ध यनूबाई हिला सोडवण्यासाठी चालले होते.दुचाकी गोदावरी नदीवरील कमलपूर येथील बंधाऱ्यावर मधोमध आल्यानंतर बंधाऱ्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीस्वराचा तोल गेला.बंधाऱयाला संरक्षक कठडे नसल्याने दुचाकीवरील हे चौघेही नदीत पडले. पडताना त्यांना बंधाऱ्यातिल लोखंडी ढाप्यांचा मार लागला असल्याची शँका व्यक्त केली जात आहे.चौघेही सध्या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर साठलेल्या पान्यात जाऊन पडले.दरम्यान ही घटना नदीत मासे पकडणार्या काही तरुणांनी पहिली त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी आपल्या जवळील चप्पू पाण्यात फेकून मॅचिंद्र बर्डे यांना वाचवले. परन्तु इतर दोघे खोल पाण्यात बुडाल्याने त्यांना वाचवणे शक्य झाले नाही.तर वृद्ध यनुबाई हिचा मृतदेह हाती आला आहे. अन्य दोघांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.बंधर्यावरील रस्त्यावर फूट-फूटभर खड्डे पडलेले असल्याने असे जीवघेणे अपघात होत आहेत.
कमालपूर, बाजाठाण व शनिदेवगाव येथील ग्रामस्थ व आदिवासी समाजातील तरुणांनी बंधार्यामध्ये शोध मोहीमेत मोठी मदत केली. रात्री उशिरा श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पी आय दशरथ चौधरी यांना माहिती मिळताच, हे, कॉ, राजेंद्र त्रिभुवन पोलीस मित्र बाबा सय्यद तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
यावर्षी जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून यातील पाण्याचा फुगवटा कमालपूर बंधाऱ्यापर्यंत आलेला आहे. त्यामुळे बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. यामुळे रात्रीचा अंधार असल्याने बंधार्यात पडलेल्या तरुणांना शोधण्यात मोठी अडचण येत आहे.
0 Comments