शिर्डी (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री साईबाबा संस्थान नोकरांच्या पतपेढीने गेल्या सहा महिन्यात भाविकांना चांगली सुविधा, सभासदांसाठी पारदर्शी निर्णय घेतले असून संस्थेच्या नफ्यातही मोठी वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यात संस्थेला सुमारे चार कोटी नफा झाला असल्याचे सांगत साई संस्थान नोकरांच्या पतसंस्थेमार्फत यंदा दिवाळीनिमित्त सभासदांना 15 टक्के डिव्हिडंड आणि ठेवीवर नऊ टक्के व्याज असे मिळून दोन कोटी रक्कम कामगारांना दिवाळी भेट स्वरूपात दिली जाणार आहे.
त्याचबरोबर भिंतीवरील घड्याळ, पाच लिटर तेलाचा डबा, प्रत्येकी एक किलो फरसाण व एक किलो मिठाई तसेच 50 किलो साखर देऊन या पतसंस्थेच्या सुमारे अठराशे सभासदांची दिवाळी यंदा गोड केली जाणार आहे .अशी माहिती साईबाबा संस्थान नोकरदार पतपेढीचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी दिली आहे.
यावर्षी दिवाळी निमित्त साई संस्थांनच्या नोकर पतपेढीच्या सभासदांना मोठी दिवाळी भेट मिळत असून सर्व सभासदांमधून मोठा आनंद व्यक्त होत आहे. या पतसंस्थेवर यावर्षी निवडणूक होऊन सहा महिन्यापूर्वीच नवीन संचालक मंडळ व पदाधिकारी आले आहेत व त्यांनी आपल्या कार्यकाळातील या पहिल्या दिवाळीला मोठी दिवाळी भेट तसेच सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय यावर्षीपासून घेण्यास सुरुवात केली असल्यामुळे या संस्थेच्या सभासदांमधून मोठे समाधान व्यक्त होऊन संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांचे कौतुकही करण्यात येत आहे.
या संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी सांगितले की, गुरुवार दिनांक 17 ऑक्टोबर 2024 रोजी शिर्डी येथे संस्थेच्या सभासदांना दिवाळी भेट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .साई संस्थांनचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर तसेच सरला बेटचे महंत रामगिरीजी महाराज व शिर्डीचे ज्ञानेश्वर मंदिरांचे महंत काशिकानंद महाराज यांच्या उपस्थितीत हा दिवाळी भेट वितरण प्रारंभ कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून साई संस्थांनचे प्रशासकीय अधिकारी श्रीमती प्रज्ञा मंहाडुळे ,संदीपकुमार भोसले, विश्वनाथ बजाज, मुख्य लेखा अधिकारी श्रीमती मंगला वराडे, संरक्षण अधिकारी पो. नि.रोहिदास माळी आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच साई संस्थांनमध्ये शिर्डी व आसपासच्या 20- 21 गावांमधून शिर्डीला येणारे कर्मचारी आहेत. त्यांनाही त्यांच्या गावामध्ये दिवाळी भेटवस्तू मिळावी म्हणून ती सभासदांच्या मागणीनुसार गावापर्यंत पोहोच करण्यात येणार आहे. त्या त्या तारखेनुसार व वेळेनुसार सभासदांना आपल्या गावातही या दिवाळी भेटवस्तू मिळणार आहेत. असे सांगत श्री साईबाबा एम्प्लॉईज सोसायटी ही जिल्ह्यामध्ये अग्रेसर अशी संस्था असून या संस्थेवर नुकतेच सुमारे सहा महिन्यापूर्वी नवीन संचालक मंडळ व पदाधिकारी आलेले असून अनेक सभासद हिताचे, पारदर्शी व चांगले निर्णय त्यांनी घेतले आहेत. लवकरच साईतीर्थ नावाने बाटलु बंद शुद्ध पाणी विक्रीसाठी संस्थेच्या वतीने आणले जाणार आहे. साई भक्तांना संस्थेच्या वतीने चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असून संस्थेच्या सर्व स्टॉलवर भाव फलक लावण्यात आले आहेत. लवकरच गुगलवर ,फोन पे वर सुविधा दिली जाणार आहे. डिजिटल लॉकर सिस्टीम कार्यान्वित केली जाणार आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी दिली असून दिवाळी भेटवस्तू वितरण प्रारंभ कार्यक्रमाला सर्व सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री साईबाबा एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव तुकाराम पवार, व्हा. चेअरमन पोपटराव भास्कर कोते, तसेच संस्थेचे संचालक महादू कांदळकर, संभाजी तुरकणे, मिलिंद दुनबळे, भाऊसाहेब लवंडे ,सौ सुनंदा जगताप, कृष्णा आरणे ,देविदास जगताप ,तुळशीराम पवार, इकबाल तांबोळी ,सौ लता बारसे, भाऊसाहेब कोकाटे, विनोद गोवर्धन कोते ,रवींद्र बाबूराव गायकवाड ,गणेश अहिरे, रंभाजी गागरे, व तज्ञ संचालक भाऊसाहेब लबडे, सचिव नबाजी नामदेव डांगे, सहसचिव विलास गोरखनाथ वाणी व संस्थेचे सर्व कर्मचारी यांनी केले आहे.
0 Comments