शिर्डी व परिसरात कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी! साई संस्थांनच्या वतीनेही मंदिरात रात्री मंत्रोच्चार करत करण्यात आली चंद्रपूजा !

शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डी -
सावळीविहीर आणि परिसरात कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात, आनंदात, दूध आटवत, चंद्रपूजा करत साजरी करण्यात आली.शिर्डी येथे श्री साईबाबा संस्‍थानच्या वतीने “कोजागिरी पौर्णिमा” हा स्‍थानिक उत्‍सव विधीवत साजरा करण्‍यात आला. रात्रौ ११.०० ते १२.०० समाधी मंदिरात श्रींचे समोर मंत्रोच्‍चार करणेत येवून रात्रौ १२.०० वाजता दुध, चंद्र-पुजा करणेत आली. चंद्र पुजेनंतर श्रींची शेजारती संपन्न झाली. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर , प्रशासकीय अधिकारी सं‍दीपकुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात आदी उपस्थित होते.

.

त्याचप्रमाणे शिर्डी शहरातही विविध संघटना यांच्या वतीने ही चौका चौकात कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला. आदर्श विद्यामंदिर समोरील पटांगणातही सचिन भैरवकर, व मित्रमंडळींनी कोजागिरी उत्सव साजरा केला.
शिर्डी प्रमाणेच शिर्डी परिसरातील सावळीविहीर बुद्रुक येथील श्री हनुमान मंदिरासमोर कोजागिरी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. त्यामध्ये सरपंच महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब जपे, उपसरपंच विकास जपे, बाबासाहेब जपे, शरद जपे, बाळासाहेब काशीद, राजू कापसे, शरद गडकरी आदींसह युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सावळी विहीर वाडीवरही डॉक्टर सुजय दादा हाउसिंग सोसायटी प्रेणित रामराज्य प्रतिष्ठानचे रावसाहेब एखंडे, शेलार, आदींसह अनेक युवक महिला व येथील रहिवाशांच्या वतीने  कोजागिरी साजरी करण्यात आली. येथे  देवीच्या समोर देवी भक्ती गीतांचा  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.तसेच आसपासच्या गावातही कोजागिरी 




पौर्णिमेनिमित्त ठिकठिकाणी विविध संघटना, संस्थेमार्फत नाचत, गात दूध आटवून, चंद्रपूजा व चंद्राला नैवेद्य देत दूध प्रसाद प्राशन करत कोजागिरी पौर्णिमेचा अनेकांनी आनंद घेतला. कोजागिरी पौर्णिमा उत्सवानिमित्त लहान थोर सर्वजण रात्री बारा वाजेपर्यंत ठीक ठिकाणी दूध आटवताना दिसून येत होते. कुणी गाताना, कुणी नाचताना, कोणी गप्पा मारताना तर कोणी भेळ, भजी यावर ताव मारताना दिसून येत होते. रात्री 12 वाजता सर्वजण आटवलेल्या दुधाचा प्रसाद घेत होते. अनेक ठिकाणी विविध सांस्कृतिक ,संगीताचे, कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ठीक ठिकाणी स्पीकरवर गाणी, बॅन्जो लावल्याचेही दिसून येत होते. एकूणच सर्वत्र कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात, आनंदात साजरी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments