दिलीप शिंदे
सोयगाव दि.०२-- भुलाबाई हा प्रामुख्याने महाराष्ट्रातील ग्रामीण भागात लहान मुली ते मोठ्या स्त्रियांनी साजरा केला जाणारा एक पारंपरिक व सांस्कृतिक खेळ आहे.भुलाबाई म्हणजे आदिशक्ती माता पार्वती आणि भुलोबा म्हणजे भोळा शंकर होय.
पार्वती देवी भिल्लीणीच्या रूपात पती शिवशंकरासोबत माहेरी येते आणि संपूर्ण वातावरण आनंदी करते, अशी धार्मिक व सांस्कृतिक मान्यता आहे. हा एक प्रकारे निसर्गाचा व सृजनाचा उत्सव मानला जातो. हा उत्सव साधारणपणे भाद्रपद पौर्णिमेपासून आश्विन पौर्णिमेपर्यंत (कोजागिरी पौर्णिमा) साजरा केला जातो. घरातील पाटावर नऊवारी साडी नेसलेली भुलाबाई आणि धोतर-फेटा घातलेला भुलोजी (शंकर) यांच्या मातीची मूर्ती मांडतात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या मूर्तींचे वाजत-गाजत विसर्जन केले जाते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात संध्याकाळी सोळा वर्षांपर्यंतच्या मुली भुलाबाई समोर फेर धरून पारंपरिक लोकगीते व गाणी म्हणतात ही गाणी कोणत्याही वाद्यविना विशिष्ट लयीत टाळ्या वाजवून व टिपऱ्या खेळून म्हटली जातात.यामध्ये माहेर व सासरचे संबंध, नातेसंबंध आणि निसर्गाचे वर्णन करणाऱ्या गमतीशीर ओव्या तनु निकुंभ, दिक्षा कदम, कीर्ती हिरे, खुशी शिरसाट, सिद्धी गव्हाणे,प्रतीक्षा निकुंभ, प्रज्ञा कदम या मुलींनी म्हटल्या गाण्यांच्या शेवटी गोड पदार्थ प्रसादाची (खाऊ) देवाणघेवाण केली जाते, जिथे मुलींना आधी खाऊ ओळखावा लागतो त्यानंतर उपस्थितांना प्रसाद (खाऊ) वाटला जातो.
0 Comments