सकल ख्रिस्ती समाज व परिवर्तनवादी संघटनेच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर

माळी घोगरगाव येथील हिंदुत्ववादी मोर्चामध्ये ख्रिस्ती धर्माविषयी केलेल्या बदनामीकारक वक्तव्याचा जाहीर निषेद

श्रीरामपूर -- माळी घोगरगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील खोट्या धर्मांतरणाच्या प्रकरणी झालेल्या हिंदुत्ववादी मोर्चामध्ये ख्रिस्ती धर्माविषयी बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई  करण्याची मागणी सकल ख्रिस्ती समाज व परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने करण्यात आली
  या संदर्भातील निवेदन अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयातील पोलीस निरीक्षक चारुदत्ता खोंडे यांना निवेदन देण्यात आले.
    माळी घोगरगाव ता वैजापूर जि छत्रपती संभाजी नगर येथे धर्मांतराचा खोटा आरोप करून तेथील ख्रिस्ती धर्मगुरू व शैक्षणिक संस्थेच्या विरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात  होता या मोर्चातील उपस्थित वक्त्यांनी ख्रिस्ती धर्मगुरू,संस्था व प्रभू येशू , पवित्र मरिया , संत मदर तेरेसा यांच्या विषयी आक्षेपहार्य व बदनामीकारक वक्तव्य करून तमाम ख्रिस्ती समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ख्रिस्ती समाजात  संतापाची लाट उसळली आहे.
 निवेदनात पुढे म्हटले की, एका शिक्षकाने  ' येथील शिक्षण संस्था चालकावर सूड उगविण्या साठी धर्मपरिवर्तनाचा खोटा बनाव करून मूळ प्रश्नाला बगल देऊन जाणीवपूर्वक ख्रिस्ती धर्मगुरू, संस्था, यांना जाणूनबुजून लक्ष करण्यात येत आहे. 
 यावेळी राज्यामध्ये व देशामध्ये अल्पसंख्याक  समाजावरील अन्याय अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून ही चिंतेची बाब असल्याची भावना व्यक्त करण्यात आल्या याप्रसंगी अनिल भोसले, प्रवीणराजे शिंदे, पी.एस निकम दीपक कदम राजेंद्र भोसले शिंदे, , पास्टर आण्णअमोलिक, सुरेश ठुबे, निशिकांत पंडित, सतीश पाटोळे बाळासाहेब भोसले पॉल बनकर  सुनिल वाघमारे  इग्नाती रूपटक्के सुरेश अमोलिक पास्टर राजेश कर्डक रविंद्र गायकवाड  विजय बोर्डे अण्णासाहेब  अमोलिक आदींसह मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments