विश्व कल्याणासाठी महंत आत्माराम गिरीजी महाराज यांची नर्मदा किनारी साधना!

दोन दिवसीय संत, महंत सत्संग कार्यक्रमात होणार सहभागी!

शिर्डी ( प्रतिनिधी)-
पवित्र नर्मदा नदी ही केवळ नदी नाही तर ती जीवनदायीनी आहे. मोक्षदायिनी आहे.श्रद्धा, अध्यात्म आणि भक्तीचे प्रतीक आहे. नर्मदा नदीच्या दर्शनाने भक्तांचे पाप नष्ट होतात. त्यामुळेच नर्मदा नदीला अत्यंत पुण्यदायी मानले गेले असल्याचे मत श्री नर्मदेश्वर सेवाधाम चे महंत संन्याशी आत्माराम गिरीजी महाराज यांनी व्यक्त केले आहे. 
  महंत संन्याशी आत्माराम गिरीजी महाराज हे नुकतेच नर्मदापुरम रुंड धाम येथे पवित्र नर्मदा किनारी साधनेसाठी गेले असून त्यांनी सर्व साधक ,भक्तगण, आणि सर्व जनमानसांच्या कल्याणासाठी नर्मदे मैयाला प्रार्थना केली आहे. तत्पूर्वी श्री नर्मदेश्वर सेवाधाम, पिंपरी निर्मळ येथून मंहत आत्माराम गिरीजी महाराज यांनी शनिवार 26 सप्टेंबर 2026 रोजी पौर्णिमेच्या मुहूर्तावर सायंकाळी मोठ्या भक्तीमय वातावरणात आपल्या या धार्मिक तीर्थयात्रेसाठी प्रस्थान केले. सावळीविहीर येथे अनेक साधकांनी भेट घेऊन महाराजांचे स्वागत करत आशीर्वाद घेतले. त्यानंतर मंहत आत्माराम गिरीजी महाराज यांनी कोपरगाव बेटातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमात भेट देऊन दर्शन घेतले. नंतर कोपरगाव येथून झेलम एक्सप्रेस ने ते नर्मदापुरम येथे गेले व तेथून रुंड धाम येथे जाऊन नर्मदा किनारी साधना केली. सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी नर्मदा मैया कडे प्रार्थना केली. त्यानंतर मंहत आत्माराम गिरीजी महाराज यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, नर्मदेच्या शांत प्रवाहात मन स्थिर झाले की, आत्मा निर्मळ होतो आणि जीवनाला नवी, खरी दिशा मिळते. नर्मदा किनारी अनेक धार्मिक स्थाने आहेत. नर्मदेच्या पाण्यात पाप नष्ट करण्याची अद्भुत शक्ती असल्याचे मानले जाते म्हणून अनेक भक्त नर्मदा स्नान आणि दर्शनाला विशेष महत्त्व देतात. नर्मदा स्नान, नर्मदा दर्शन व नर्मदा परिक्रमा केल्याने जीवनातील संकटे दूर होतात आणि मनाला आध्यात्मिक शांती मिळते. असा नर्मदा मैया चा हा महिमा असून नर्मदा किनारी मन स्थिर ,शांत होते. नर्मदेच्या प्रवाहासोबत अहंकार ,चिंता आणि दुःख वाहून जाते. व अंतकरणात भक्ती, श्रद्धा ,समाधान निर्माण होते. स्वतः भगवान शिवानी नर्मदेला आशीर्वाद देताना सांगितले की, तू पृथ्वीवरील सर्व जीवांचे कल्याण करशील तुझ्या केवळ दर्शनाने ही भक्तांचे पाप नष्ट होतील. त्यामुळेच नर्मदा नदीला पुण्यदायी, मोक्षदायीनी, जीवनदायींनी म्हटले आहे. अशा या पवित्र महान नर्मदा मैया च्या किनारी साधना करत विश्वकल्याणासाठी प्रार्थना केल्याचे महंत संन्यासी आत्माराम गिरीजी महाराज यांनी सांगत नर्मदा मैयाच आपली माता, तीच शक्ती, तीच साधना आहे. प्रत्येकाने नर्मदे हर जिंदगी भर असा नारा मनोमन देवा, हे नर्मदेश्वर सेवाधाम चे घोषवाक्य आहे. त्यामुळे जेणेकरून नर्मदा मैया प्रसन्न होईल व प्रत्येकाचे त्यामुळे कल्याण साधता येईल. असे संन्याशी आत्माराम गिरीजी महाराज यांनी म्हटले आहे. मंहत आत्माराम गिरीजी महाराज हे येथील दोन दिवसीय साधू महंत सत्संग कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत.

Post a Comment

0 Comments