सोयगाव पोलीस ठाणे हद्दीत डिजे,डॉल्बी,लेझर दिवे व ध्वनी प्रदूषण मुक्त श्री गणरायाला ढोलताशांच्या गजरात शांततेत निरोप----


 


दिलीप शिंदे 
सोयगाव दि.२६--गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोयगाव पोलीस ठाणे हद्दीत गणेश मंडळे, ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वयातून श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांना दि.२५ शुक्रवारी सायंकाळी शिस्तबद्ध पद्धतीत सुरुवात झाली होती.गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून सोयगाव पोलीस ठाणे हद्दीत एकाही गणेश मंडळाकडून डीजे, डॉल्बी, लेझर दिवे व ध्वनी प्रदूषणचा वापर टाळण्याबाबत पोलीस प्रशासनाने केलेल्या आवाहनाला मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद देत ढोलताशांच्या गजरात आपल्या लाडक्या गणरायाचा जयघोष करीत भावूक होऊन भक्तिभावाने भक्तांनी गणरायाला निरोप दिला. 

सोयगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत शांततामय विसर्जन मिरवणुका पार पडल्या. यावेळी पोलिस अधीक्षक (ग्रामीण) प्रकाश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित काईगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांच्या नेतृत्वात ज्ञानेश्वर दांडगे, गजानन दांडगे, राजू सोनवणे,अजय कोळी,संदीप सुसर, सादिक तडवी, कुणाल जाधव, समाधान बारी आदींसह पोलिस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

0 Comments