लोणी पोलीसांनी अवैध धंद्यावर केली कारवाई

राहाता +प्रतिनिधी )सुरेश ठोके

राहाता तालुक्यातील लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील लोणी बु! येथे अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली असून त्यामध्ये दारूबंदी कायद्याप्रमाणे रेड करण्यात आली असून दारूबंदी कायद्याप्रमाणे दोन हॉटेलवर गुन्हे नोंद केले आहे .

 तसेच हसनापूर चौकामध्ये नाकाबंदी करून एकूण 22 केसेस त्या मध्ये विना नंबर प्लेट,चार चाकी वाहनांना , कर्कश आवाज
कर्कलेटचे सायलेन्सर, यावर कारवाई करण्यात आली असून 17,600 रुपये आकारण्यात आला आहे.
 सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घाडगे, मा.अपर पोलीस अधीक्षक,श्री. सोमनाथ वाकचौरे, मा. एस.डी.पी.ओ.शिर्डी उपविभाग, श्री.अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नी.कैलास वाघ, PSI आशिष चौधरी, PSI बाबा सांगळे, HC सोमनाथ गाडेकर, HC कल्याण काळे,PN रवींद्र मेढे,PC निलेश सातपुते,PC नऱ्हे यांनी केली आहे...

Post a Comment

0 Comments