शिर्डी ( प्रतिनिधी)-श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने भक्तीमय आणि आध्यात्मिक वातावरणात संगीतमय श्रीमद्भागवत कथा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम ह.भ.प. भागवताचार्य सौ. भक्ती दीदी सोमनाथ देवकर (आळंदी, पुणे) यांच्या सुमधुर आणि भावपूर्ण वाणीमधून संपन्न होणार आहे. शनिवार, दि. ०८ नोव्हेंबर २०२५ ते शुक्रवार, दि. १४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दुपारी २.०० ते सायं. ५.०० या वेळेत हा कार्यक्रम श्रींचे समाधी मंदिर शताब्दी मंडप (१६ गुंठे), शिर्डी येथे होणार आहे.
या कालावधीत सौ. भक्ती दीदी यांच्या सुमधुर वाणीमधून मराठी भाषेत श्रीमद्भागवत कथा सादर केली जाणार असून, भक्तांना अध्यात्म, भक्ती आणि संस्कार यांचा अमृतानुभव घेण्याची ही एक अनोखी संधी आहे.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने सर्व साईभक्त , शिर्डी व परिसरातील ग्रामस्थांना या कार्यक्रमास उपस्थित राहून कथेमधील दिव्य संदेशांचे श्रवण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. असे साई संस्थानाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
0 Comments