उदरनिर्वाहासाठी भटकंती दाही दिशा

अहिल्यानगर (प्रतिनिधी )

    आपल्या आरोग्यासाठी फिरणे जसे आवश्यक आहे . तसे जगण्यासाठी पोटाला अन्नाची तेवढीच गरज आहे . बऱ्याचवेळा आपण प्रमाणापेक्षा जास्त जेवण करतो व ते पचवण्यासाठी फिरतो परंतू या समाजामध्ये असेही लोक आहेत की उपाशी पोटी फिरून त्यांना रोजच्या भाकरीसाठी भटकंती करावी लागते अशाच एका दिवशी दि १६/ el 20२५ रोजी मी  भल्या पहाटे ५:३० वा एक मनुष्य डोक्यावर एक भले मोठे डारले झाप साधारणताः तीस ते चाळीस किलो वजनाचे असणारे ते डारले तो विकण्यासाठी घेऊन जात होता पायी फिरून अकोल्याच्या देवठाण गर्दणी वीरगाव सुगांव कुंभेफळ टाकळी इ सर्वसाधारणतः सहाते सात किलोमीटर फिरून तो ते किमान दोनशे ते तीनशे रुपये किंमती ला विकले जाते.

 गावातील नदीच्या काठी उगवलेल्या कावळीच्या वेलाच्या जाड फांदयापासून ते बनविले जाते . एक डारले किंवा झाप बनविण्यासाठी किमान दोन ते तीन दिवस लागतात शेतकऱ्यांसाठी असणारे उपयुक्त साधन कोंबड्या डालण्यासाठी किंवा शेळयांची लहान पिल्ले ( कर्डू ' ) डालण्यासाठी याचा उपयोग होतो
भारतातील खेडीही स्वयंपूर्ण ठेवण्यासाठी ज्या बारा बलुतेदार समाजाचे योगदान आहे त्यामध्ये प्रामुख्याने लोहार सुतार सोनार न्हावी कुणबी कैकाडी वडारी अशा ततस्म जातीचा उल्लेख केला जातो यातील कैकाडी समाज हा अत्यंत कष्टाने पूर्वी असे झाप ( डारले ) बनवित होता अत्यंत कमी दरात शेतकऱ्यांना परवडेल अशा दरात केवळ आपला उदरनिर्वाह भागेल एवढ्या किमतीत तो विकत होता
कालांतराने लोखंडाचे कारखाने निर्माण झाल्याने शेतीची औजारे व लोक उपयोगी वस्तू ह्या कंपनीतून तयार होऊ लागल्यामुळे येथील बारा बलुतेदारांचे व्यवसाय हे बुडाले वपरिणामी त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे अशा भटक्या जमाती मध्ये मोडणाऱ्या लोहार समाजाने मात्र काळाची पावले ओळखत आपला बैलगाडीचा व्यवसाय जस जसा बंद पडत चालला तस तसे माणसाच्या मुलभुत असणऱ्या तीन गोष्टी म्हणजेच अन्न वस्त्र व निवारा यातील निवारा यागोष्टी कडे लक्ष देऊन लोहार समाज बांधकाम क्षेत्रातल्या सेट्रींग व्यवसायात यशस्वी भरारी घेतली आहे लोहार समाजाची अनेक मुले शिक्षणामुळे डॉक्टर वकील इंजिनिअर प्राध्यापक कृषी अधिकारी शिक्षक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत . अशा नामशेष होत चाललेल्या व्यवसाकडे सरकारने लक्ष देऊन त्यांचा कलेचा उपयोग करून घेण्यासाठी एक स्वतंत्रपणे महामंडळाची स्थापना केल्यास या समाजाला नवसंजिवनी मिळेल असा विश्वास वाटतो, 
लेखक - दिगंबर जवणे, मिरजगाव(अहिल्यानगर )

Post a Comment

0 Comments