सत्तेचा महासंग्राम न्यूज लोणी प्रतिनिधी ( ज्ञानेश्वर साबळे) राहाता तालुक्यातील हणमंतगाव मधून इंदिरानगर-पिंपळे - वस्तीकडे व गावातील ग्रामस्थांच्या शेतीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दैयनीय अवस्था झाली आहे. रस्ता असून नसल्यागत परिस्थिती निर्माण झाली आहे. हणमंतगाव हे मध्यम लोकवस्तीचे गाव असून बऱ्यापैकी कुटुंब वाड्या- वस्त्यावर राहतात. गावाच्या उत्तरेकडील बाजूस पिंपळे वस्ती, फणसे वस्ती व घोलप वस्ती येथील बहुसंख्य नागरिक या रस्त्याने प्रवास करत असतात. हा रस्ता अतिशय अरुंद व वळणाचा असून शेतकऱ्यांचा चारा पाण्याचा व शेतीचा येण्या जाण्याचा रस्ता आहे .
पावसामुळे सर्व रस्ता चिखलमय झालेला असून परिसरातील ग्रामस्थ, विद्यार्थी व कामगार शेतकरी यांना चिखल व खड्ड्यातून वाट काढत कसरत करत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. रस्त्यावर दोन्ही बाजूने. यापूर्वीही सदर रस्ता अर्धवट शासना मार्फत मुरमीकरण करून दिला होता परंतु अर्धवटरस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठते. पाणी वाहून न गेल्यामुळे सर्व रस्ता चिखलमय व खड्डेमय झालेला आहे. तरी स्थानिक प्रतिनिधीनी तात्काळ या कामात लक्ष घालून लवकरात लवकर हा रस्ता मुरमीकरण किंवा कांक्रीटीकरण करून द्यावा अशी सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेंद्र पिंपळे व सर्व ग्रामस्थांची मागणी आहे.
0 Comments