सोयगाव तालुका कृती समितीचे सोयगाव पोलिसांना निवेदन, कारवाईची मागणी --



दिलीप शिंदे
सोयगाव दि.१३- लोकनेते सहकारमर्षी तालुक्याचे भाग्यविधाते स्वातंत्रसेनानी कै. बाबुरावजी काळे यांचे नाव असलेल्या वेताळवाडी जलाशय फलकावरील नाव पुसल्या प्रकरणी चौकशी करून खोडसाळपणा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सोयगाव पोलीस ठाण्याचे सपोनी पंकज बारवाल यांच्याकडे सोयगाव तालुका कृती समितीच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
            याबाबत सविस्तर माहिती अशी, लोकनेते सहकारमर्षी तालुक्याचे भाग्यविधाते, स्वातंत्रसेनानी व वेताळवाडी धरणाचे निर्माते कै. बाबुरावजी काळे यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या  दि.९ सप्टेंबर २०२४ रोजी जन्मशताब्दी वर्षानिमित्त सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने वेताळवाडी मध्यम प्रकल्पाला कै.बाबुरावजी काळे जलाशय असे नामकरण करण्यात आले होते.त्या फलकावरील कै. बाबुरावजी काळे यांचे नाव पुसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने हा खोडसाळपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सोयगाव तालुका कृती समितीचे रवींद्र काळे, राजेंद्र काळे, कृष्णा पाटील,हर्षल काळे,निलेश गाडेकर,दत्तू निकम, दिपक देशमुख आदींनी सोयगाव पोलीस ठाण्याचे सपोनी पंकज बारवाल यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.पोलिस काय कारवाई करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments