दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी: अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत गेली तीन दशकांहून अधिक काळ प्रामाणिक व निष्ठेने सेवा बजावणारे अशोक किसनराव पटारे यांची नुकतीच अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्रीरामपूर तालुका कार्यालयीन अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पटारे यांनी ऑगस्ट १९९१ मध्ये जिल्हा सहकारी बँकेच्या सेवेत प्रवेश केला. गेल्या ३४ वर्षांत त्यांनी विविध शाखांमध्ये कार्य करताना आपल्या कार्यतत्परतेमुळे, काटेकोर शिस्तप्रियतेमुळे आणि सहकाऱ्यांशी सुसंवाद राखण्याच्या वृत्तीमुळे विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या पदोन्नतीमुळे बँक कर्मचारीवर्गात आनंदाचे वातावरण आहे.
या नियुक्तीबद्दल जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व माजी आमदार भानुदास मुरकुटे तसेच संचालक करण ससाणे यांनी पटारे यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यालयीन अधीक्षक या जबाबदारीच्या पदावर नियुक्ती झाल्यामुळे पटारे यांच्या अनुभवाचा व कार्यकुशलतेचा उपयोग बँकेच्या कार्यक्षमतेत आणि ग्राहक सेवेत निश्चितच होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
0 Comments