मनोवृत्ती बदलण्याची ताकद फक्त अखंड हरिनाम सप्ताहात - महंत रामगिरी महाराज.

दिलीप लोखंडे 

देवगाव शनी येथील १७८ वा अखंड  हारिनाम सप्ताह भाविकांसाठी महा कुंभ पर्वणी

टाकळीभान-प्रतिनिधी:-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे,  मनोवृत्ती बदल झाला  तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते, मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये व अखंड हरिनाम सप्ताहात आसल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.

श्री क्षेत्र देवगाव शनी व सप्त क्रोषी येथील योगीराज गंगागिरी महाराज १७८वा अखंड हरिनाम सप्ताहातील चौथ्या दिवशी चे भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायातील श्लोकावर प्रवचन पुष्प गुंफतानीं  महाराज पुढे म्हणाले की,  भगवंत भक्ताची जात बघत नाही जो भव्त भंगवताची भक्ती करतो त्याला तो प्राप्त होतो सप्ताहातील भजनाने  भव्ताच्या मनाची शुध्दी होते एखादी वस्तू अतिदुर असली तर दिसत नाही डोळ्यातील अंजन स्वतःला दिसत नाही त्याप्रमाणे नास्तिकाला देव दिसत नाही पण गंगागिरी महाराज भजनात भजनाने  मनुष्याच्या जीवनात समाधान मिळते आज समाजाला अध्यात्माची फार मोठी गरज आहे.गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहातुन अनेकांचे व्यसन नष्ट झाले स्वातंत्र्यपूर्व  काळातही महाराजांनी सप्ताह अनेक अडचणी ला सामोरे जात प्रभावीपणे सप्ताह सुरू ठेवले आज समाजाची अवस्था पाहिली तर साठ टक्के समाज बिघडलेला आहे, व्यसनाधिन झाला आहे, कुठलही व्यसन विचारा अनेक व्यसनं आहेत. ज्याला वाईट व्यसनं म्हणतो ते आहेच त्याबरोबरच संपत्ती, सत्ता,संतती हे देखिल व्यसनातील प्रकार आहेत. याच्या पाठीमागेच समाज लागलेला आहे व बिघडलेला आहे. आणि म्हणून या समाजाला खर्‍या अर्थानं शांती मिळत नाही. चाळीस टक्के समाज थोडा आहे तो कुठं याच्यापेक्षा काहीतरी वेगळं मिळावं म्हणून तो विचार करतो पण तोही दिशाहिन आहे, त्याला योग्य दिशा मिळेना झालीय. नेमकं मी काय करायला पाहिजे? माझं चांगलं वागण्याकरिता माझं जीवन स्वच्छ, जीवन सुखी होण्यासाठी काय करायला पाहिजे? असा दिशाहिन समाज झाला आहे. अध्यात्मात आल्यास भजन - किर्तन नाही आले तरी चालेल परंतु वाईट मार्गाने तरी तरुण जाणार नाही .शास्त्र हे नित्य नवीन असुन त्यामुळेच युवकानी व्यसनाच्या आहारी न जाता अध्यात्मिक मार्गावर चालल्यास तरुणाना चांगली दिशा मिळेल अशा दिशाहिन समाजाला योग्य दिशा देऊ कोण देत असेल तर ते फक्त अखंड हरिनाम सप्ताहाच देऊ शकतो. मनुष्य अज्ञान झाकण्यासाठी पाप करतो. योगीराज गंगागिरी महाराज यांनी अनेक भक्तांच्या जीवनातील दुःख दूर करून सन्मार्गावर आणले महाराजांनी पारतंत्र्यात अनेक अडचणींना सामोरे जात वेळ प्रसंगी माधुकरी मागवत कन्या घुगर्या शिजवत समाजासाठी अन्नदान सुरू ठेवले मनाची वृत्ती बदलण्याची ताकत फक्त हरिनाम सप्ताह आतच असल्याचे महाराज म्हणाले.

याप्रसंगी प्रमुख उपस्थित डॉ दिनेशभाऊ परदेशी,पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकरजी शिंदे,अनुराधाताई आदिक,कुष्णा पा डोणगावकर,डा राजीव डोंगरे,नवनाथ महाराज मस्के, पंचायत समितीची माजी सभापती डॉ, वंदना मुरकुटे, अशोकचे संचालक निरंजन मुरकुटे,बाळासाहेब महाराज रंजाळे,ऊत्तम महाराज गाढे,अमोल महाराज गाढे रामभाऊ महाराज,व्रिकम महाराज,राजेश्र्वरगिरीजी महाराज,रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरीजी महाराज,शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज,योगानंद महाराज सरला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज यांच्यसह 4 ते 5 लाख भाविकांची उपस्थिती होती
चौकट:-
वारकऱ्यांसाठी महा कुंभ समजला जाणारा योगीराज गंगागिरी महाराज यांचा 178 वा अखंड हरिनाम सप्ताह शनिदेव गाव व सप्त कृषी मध्ये गोदावरी तीरी संपन्न होत आहे .गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथून होत असून त्या ठिकाणीही महा कुंभ होत असतो येथील सप्ताह पाहून याच गोदामाईच्या तीरावर जागृत देवस्थान शनिदेव, प्रभू रामचंद्राचे वास्तव्य असलेलं अभयारण्य व बाजाठाणतील आशुतोष महाराज महादेव मंदिर स्वयंभू रामेश्वर मंदिर असे विविध देवदेवतांचा वास्तव्य असलेल्या भूमीत दररोज लाखो भाविक भक्त या अखंड हरिनाम सप्ताहात भेट देऊन गोदा स्नान, आमटी भाकरीचा महाप्रसाद, व आध्यात्मिक भजन नामस्मरण असा त्रिवेणी संगमाचा आनंद घेत आहे व याची देही याची डोळा वारकऱ्यांचा कुंभमेळा गोदातीरी अनुभवत आहे.
चौकट
शेकडो भाविक करतात सप्ताहात रक्तदान
लोकमान्य बल्ड बँक, आदर्श ब्लड बँक, नित्य सेवा ब्लड बँक, सोलापूर ब्लड बँक अशा 4 रक्तपेढी वतीने दररोजचे 250 ते 300 भाविकांचे रक्त संकलन केले जाते त्याचबरोबर सप्ताह परिसरातील सर्व डॉक्टरस फामस्टीक 7 डॉक्टर मित्र परिवाराच्या वतीने 800 ते 1000 रुग्ण भाविकाचा विनामूल्य  उपचार केला जातो

गोदावरी नदीवरील पुलावरून भाविक सप्ताहस्थळी येताना गंगेच्या परिसराला आले महा कुंभाचे स्वरूप.

Post a Comment

0 Comments