टाकळीभान (प्रतिनिधी) -उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काल मंगळवार दि. २२ जुलै २०२५ रोजी टाकळीभान येथे श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील माजी आमदार लहू कानडे व श्रीरामपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अनुराधा ताई आदिक यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार (गट) फलकाचे अनावर नुकतेच करण्यात आले.
याप्रसंगी मार्केट कमिटीचे माजी सभापती नानासाहेब पवार, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, प्रा. कार्लस साठे सर, विष्णुपंत खंडागळे, प्रा. जयकर मगर, देविदास कोकणे, प्रगतशील शेतकरी काका डिके,शिवाजीराव धुमाळ, प्रा. दिलीप कोकणे, सुभाषराव पटारे, बंडू कोकणे, विष्णुपंत पटारे, दादासाहेब कापसे, बंडू कोकणे, अॅड रत्नाकर रणनवरे, दत्तात्रय लोखंडे, अनिल कोकणे,
सुनील बोडखे, रामनाथ माळवदे, मधुकर गायकवाड, अविनाश लोखंडे, मधुकर रणनवरे बंडू घोडके,आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी माजी कानडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाच्या पक्षाला बळकटी करण्यासाठी व आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी श्रीरामपूर व राहुरी या मतदार संघातील संपूर्ण ८४ गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गाव तेथे शंभर शाखा स्थापन करण्यात येत असून. त्यासाठी प्रत्येक गावात कायम स्वरूपी टिकेल अशा लोखंडी शाखेचे फलक लावण्यात येणार आहेत. देवळाली प्रवरा पालिका तथा श्रीरामपूर तालुका नगरपरिषद सर्व भागात आमचा दौरा सुरू असून गाव तेथे शाखा स्थापन करण्याचा मानस घेतला आहे.
यावेळी माजी नगराध्यक्षा अनुराधा ताई आदिक, राजाभाऊ कोकणे, प्राध्यापक कार्लस साठे सर, आदींनी मनोगत व्यक्त केले.
चौकट- भाजप व राष्ट्रवादी अजितदादा गट राज्यात एकत्र सत्य असतानाही, माजी आमदार लहुजी कानडे, यांनी आपल्या भाषणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस यांचा वाढदिवसाचा उल्लेख न केल्यामुळे गावात चर्चा.
0 Comments