श्री साई संस्थान एम्प्लॉइज सोसायटीच्या नूतन प्र. सचिव पदी विलास गोरखनाथ वाणी.



शिर्डी.. राजेंद्र दुनबळे

अहमदनगर जिल्ह्यातील नावाजलेली सहकारी संस्था म्हणून ओळख झालेली. श्री साईबाबा संस्थान कामगारांची कामधेनु असलेली श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑप सोसायटी लि, शिर्डी ची व्यवस्थापक कमिटीची  मासिक सभा संपन्न झाली
 या सभेत अनेक विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. त्यात संस्थेचे मावळते सचिव श्री. नबाजी डांगे पा. यांनी आपला पदभार संस्थेचे विदयमान सहसचिव श्री. विलास गोरखनाथ वाणी पा. यांचेकडेस सुपूर्त केला.

तसेच या सभेत संस्थेचे सह. सचिव श्री विलास गोरखनाथ वाणी पा. यांची एकमताने संस्थेच्या प्रभारी सचिव पदी नेमणुक करण्यात आली. तर श्री बाबासाहेब अनर्थे पा. यांची सह. सचिव पदी व श्री संभाजी कोते पा. सहाय्यक सह. सचिव पदी नेमणुक करण्यात आली. नूतन निवडीचे चेअरमन, व्हा चेअरमन,संचालक मंडळ,सभासद व कर्मचारी यांनी स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेछा दिल्या .. या सभेत संस्थेच्या ४७ स्केलधारक कर्मचा-यांना प्रत्येकी एक इंक्रिमेंट व रु-७००/- असलेली अंतरीम वाढ मुळ वेतनात समाविष्ट करण्यात आली. त्याचप्रमाणे किमान वेतन धारक ६६ कर्मचा-यांना स्केल लागु करण्यात आले. तसेच फिक्स वेतनधारक कर्मचा-यांना प्रत्येकी रुपये-२०००/-वेतनवाढ व अनुकंपा तत्वावर सेवेत असलेल्या एका महिला कर्मचा-याला स्केल लागु करण्यात आले. तसेच चेकर, र, सुपरवायझर, मालपुरवठा, अशा ११ कर्मचा-यांना प्रत्येकी एक अतिरक्त इंक्रिमेंट लागु करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.. या प्रसंगी.चेअरमन विठ्ठल पवार सह संचालक
महादू कांदळकर कृष्णा आरणे.भाऊसाहेब कोकाटे .संभाजी तुरकणे.देविदासजगताप.विनोद कोते.मिलिंद दुनबळे.तुळशीराम पवार रवींद्र गायकवाड. भाऊसाहेब लवांडे इक्बाल तांबोळी .सुनंदा जगताप 
लता बारशे .रंभाजी गागरे .भाऊसाहेब लबडे .आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments