दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी : युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम (Youth Transformation Forum) च्या माध्यमातून मोफत शिक्षण, मार्गदर्शन व शिष्यवृत्ती यॊजनॆ अंतर्गत UPSC मुख्य परीक्षा २०२४ च्या विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा , मुख्य परीक्षा मध्ये सराव परीक्षा ,मार्गदर्शन व त्यानंतर मुलाखती साठी मॉंक ,ग्रुप डिस्कशन मुलाखतीची तयारी व मार्गदर्शन घेण्यात आले यामध्ये सहा विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
या सत्रात या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्रशासकीय अधिकारी माजी पोलीस महासंचालक प्रबोध कुमार, डॉ केतन पाटील IPS, श्री सोहम मांढरे IPS, सागर खराडे IPS, कुरमा राव IAS , केशव हिंगोणी IAS , नवजीवन पवार IAS आदी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.यशस्वी विद्यार्थी मध्ये बिरदेव ढोणे (AIR ५८१) ,अश्विनी धामणकर (AIR ५८२), ओंकार कुंटाले (AIR ६७३), श्रीतेश पटेल (AIR ७४६) , डॉ.जसप्रीत कौर(AIR ८२९) आणि हेमराज पानोरीकर (AIR ९२२) यांनी यश संपादन केले आहे. गेले पाच वर्ष युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरम UPSC व MPSC विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने IAS व IPS अधिकाऱ्यां मार्फत मोफत मार्गदर्शन केले जाते.
UPSC च्या १० विद्यार्थ्यांना महिना १० हजार शिष्यवृत्ती दिली जाते.गेल्या वर्षी ४ विद्यार्थीनी UPSC मध्ये यश संपदान केले आहे. आता पर्यत UPSC मध्ये १४ व MPSC ,CAPF आदी स्पर्धा परीक्षेतून ३२ विद्यार्थ्यानी यश संपादन केले आहे.
महाराष्ट्रातील होतकरू विद्यार्थीनी युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान युथ ट्रान्सफॉर्मेशन फोरमचे अध्यक्ष डॉ विक्रम गायकवाड यांनी केले आहे, संपर्क नं ८९९९३२२८५५ .
0 Comments