डॉ. दत्ता विघावे यांची खरीखुरी गगन भरारी

नंदकुमार बगाडे 

                    रशियन स्पेस एजन्सी जिओस्कॅन २०२५ मध्ये वोस्टोचनी कॉस्मोड्रोममधून सोयुझ रॉकेटद्वारे शैक्षणिक उपग्रह अल्फेरोव्ह २३९ प्रक्षेपित करणार आहे. यामध्ये जगातील निवडक प्रतिभावान व्यक्तींचे नाव, परिचय आणि फोटो अंतराळात प्रक्षेपित केले जाणार आहेत. त्या निवडक प्रतिभावंत व्यक्तींमध्ये भारताचे सुपुत्र डॉ. दत्ता सिंधुताई बाबुलाल विघावे यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. ही माहिती रशियन स्पेस एजन्सी जिओस्कॅनने डॉ.दत्ता विघावे आणि विश्वशांतीदूत डॉ.सुधीर तारे यांना ई-मेलद्वारे दिली आहे. 

                 तसेच ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध युनिव्हर्सिटी ग्रिफिथ युनिव्हर्सिटीतर्फेही डॉ. दत्ता विघावे यांचा अद्भुत आणि अनोखा सन्मान करण्यात आला आहे. सन २०२५ मध्ये, मिशन प्लॅटिपस अंतर्गत, ग्रिफिथ युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रेलियाद्वारे पृथ्वीपासून ४०० किलोमीटर अंतरावर शैक्षणिक उपग्रह क्यूबसॅट अंतराळात सोडला जाईल. त्यामध्येही जगातील निवडक नामवंत गुणवान व्यक्तींची नावे आणि त्यांचा परिचय अंतराळात सोडण्यात येणार आहे. हि माहिती जगभरातील अतिउच्च दर्जाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माहितीसाठी पुरविली जाणार आहे.

                  त्याचबरोबर जगातील नामांकित व सुपसिद्ध अमेरिकास्थित अवकाश संशोधन संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन अर्थात नासाचे पुढील आंतरराष्ट्रीय चंद्र रात्री समन्वय समितीचे निरीक्षण (इंटरनॅशनल ऑब्झर्व्ह द मून नाईट) शनिवार, दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी आहे. त्यामध्ये सहभागासाठी नासाने डॉ. दत्ता विघावे यांना विशेष निमंत्रण दिले आहे. या बद्दल नासाने खास सहभाग पत्रही डॉ. दत्ता विघावे यांना पाठविले आहे.

                   मुळत: शिक्षक असलेले डॉ. दत्ता विघावे, क्रिकेट पंच, प्रशिक्षक व समिक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. क्रिडा, पत्रकारीता, पर्यावरण, साहित्य, शिक्षण, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. या क्षेत्रात वेगवेगळे पाच विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहेत. सहावा विश्वविक्रम त्यांच्यापासून काही पावलेच दूर आहे. क्रिकेटमधील उत्कृष्ठ कार्यासाठी अमेरिकन विद्यापिठाची मानद डॉक्टरेट पदवी मिळाली असून युनायटेड नेशन्शच्या ग्लोबल टॅलेंट पूलचे सदस्य आहेत. तसेच वर्ल्ड पार्लमेंटचे महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्षपद त्यांच्याकडेच असून त्यांच्याच संकल्पनेतून वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड जगभरातील वंचित घटकांना द्यायला सुरुवात झाली. कोरोना संक्रमण काळात अनेक गरजूंना मदत करताना अनेकांना प्रेरीत करण्यासाठी पुरस्कृत करताना स्वतःही विश्वविक्रमांच्या पुस्तकात झेप घेतली.

                   अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेल्या डॉ. विघावे यांना महाराष्ट्र सरकारचा मानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण मिळाला आहे, शिवाय विश्वशांतीदूत( ग्लोबल पीस) अवॉर्ड प्राप्त झाला आहे. मृत्यूनंतर देहदानाचा निर्णय त्यांनी स्वतः तर घेतलाच पण अनेकांना देखील हे महान समाजकार्य करण्यास उद्युक्त केले आहे. नेत्ररोग, कुष्ठरोग, कर्करोग्यांसाठी शिबीरे, रॅलीजचे आयोजन केले असून अपंग, अनाथ मुले, महिला व पुरुषांसाठी तसेच व्यसनमुक्तीसाठी विशेष उपक्रम राबविले आहेत. आदिवासी शेतकरी, अत्याचारीत मुले व मुलींसाठी प्रशिक्षण वर्गही आयोजित केले आहेत. क्रिकेटमध्ये स्वतःच्या मुलासोबत पंचगिरीत विश्वविक्रम केला तर ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना परदेश दौऱ्यांचा अनुभव येण्यासाठी विदेशात जाऊन अनुभव संपन्न करून आणले.

                   मायदेश हे प्रथम प्राधान्य असलेले डॉ.विघावे हे वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेनुसार मार्गक्रमण करत असून संपूर्ण जग हेच आपले कुटुंब या धोरणानुसार प्रत्यक्ष जीवनात आचरण करत आहेत. असे हे भरघोस कार्य करत असलेल्या डॉ. विघावे यांना प्रत्येक क्षेत्राचा खास अनुभव आहे.

                   जगातल्या अग्रणी अवकाश संशोधन संस्थांकडून एवढा मोठा आश्चर्यकारक, अविश्वसनीय आणि अद्वितीय सन्मान प्राप्त झाल्याबद्दल डॉ. दत्ता विघावे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments